कोकण

बांदा केंद्रशाळेतील उपक्रम आदर्शवत

CD

30131

बांदा केंद्रशाळेतील उपक्रम आदर्शवत

रवींद्र खंदारे ः साताऱ्यातील शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली भेट

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ७ ः बांदा केंद्रशाळेत राबविण्यात येत असलेले विद्यार्थी गुणवत्ता तसेच शाळेची पटसंख्या वाढीसाठी राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम आदर्शवत असल्याचे मत सातारा उपशिक्षणाधिकारी खंदारे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणान्वये निपुण भारत कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राथमिक स्तरावर राबविण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्यात अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असलेल्या पीएम श्री जिल्हा परिषद बांदा केंद्रशाळेला सातारा येथील उपशिक्षणाधिकारी श्री. खंदारे यांच्यासह शिक्षक क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी बांदा केंद्रशाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
सातारा कमिटीने बांदा केंद्रशाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येत असलेले विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, लोकसहभाग, विद्यार्थ्यांचे सादरीकरण यांची पाहणी केली. या कमिटीत सातारा जिल्हा परिषद येथील शिक्षण विस्तार अधिकारी श्री. शिंगाडे, श्री. जाधव‌, सौ. गुरव‌, श्री. लोटेकर‌‌, श्री. शिंदे, केंद्रप्रमुख श्री. सातपुते, श्री. बागुल‌, श्री. भरकुंडे, श्री. पाटील, श्री. भस्मे, श्री. देशमुख, श्री. बागल, श्री. मगर, श्री. कदम, श्री. पवार, श्री. शेगडे आदी उपस्थित होते. या समितीचे स्वागत बांदा केंद्र मुख्याध्यापक शांताराम असनकर, केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, उपाध्यक्षा संपदा सिद्धये, सदस्य हेमंत मोर्ये, विलवडे सरपंच प्रकाश दळवी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कमिटीला शाळेतील उपशिक्षक जे. डी. पाटील यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup : अहमदाबाद में जितना जरूरी था, आपको तो पता ही हैं! सूर्यकुमार यादव मुंबईत येताच काय म्हणाला बघा Video Viral

Mumbai Weather: कोकण-मुंबई पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट, वातावरण कसं राहणार? हवामान तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Umarga Accident : हॉटेलमध्ये कार घूसल्याने दोघांचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी, उमरगा शहराजवळ झाला अपघात

मुंबईला ये... नाना पाटेकरांमुळे इंडस्ट्रीमध्ये आले मकरंद अनासपुरे; जुनी आठवण सांगत म्हणाले- त्या दिवशी...

Suryakumar Yadav: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी MS Dhoni ला कॉल; सूर्याने सांगितला, 'कॅप्टन कूल'चा सल्ला कसा कामी आला

SCROLL FOR NEXT