कोकण

हातखंब्यासह नऊ गावात दहा शेतकरी गट स्थापन

CD

- rat७p३.jpg-
OP२४N३००६०
रत्नागिरी ः येथील रत्ननगरी महिला शेतकरी गटाला मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे सोबत इतर मान्यवर.
-------
हातखंब्यासह नऊ गावात शेतकरी गट

सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण ; नैसर्गिक शेती करणार
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ७ ः डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनअंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील रत्ननगरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीने सेंद्रिय शेतीचे दुसऱ्या वर्षातील पहिले प्रशिक्षण पूर्ण केले. २०२३-२४ मध्ये हातखंबा पंचक्रोशीमधील नऊ गावांमध्ये दहा शेतकरी गट स्थापन करून रत्ननगरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीने नैसर्गिक शेती करण्याचे ठरवले. त्याअंतर्गत हे प्रशिक्षण घेण्यात आले.
मागील वर्षी प्रत्येक गटातील चार महिलांनी कोकण कृषी विद्यापीठ दापोली तसेच कृषी विज्ञान केंद्र कणेरी मठ, कोल्हापूर येथे सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण घेतले. यावर्षीही सर्व गटांमधील सदस्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवळी, हातखंबा, कापडगाव, वेळवंड, पाली, वळके, साठरेबांबर, कशेळीकोंड, नाणीज या गटामध्ये समाविष्ट महिलांना सेंद्रीय शेतीचे गावपातळीवर प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये विविध सेंद्रिय निविष्ठा जसे जीवामृत, दशपर्णी अर्क, गांडूळखत तयार करण्याविषयी माहिती देण्यात आली. वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय स्तरावरून अधिकाऱ्यांनी ही भेट देऊन मार्गदर्शन केले. रत्नागिरीचे तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी नित्यानंद भोसले, तंत्र अधिकारी प्रमोद पाटील, स्मार्ट प्रकल्पाचे तंत्र अधिकारी डांगे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
रत्ननगरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विद्या बोंबले, सचिव सुमंगला पालकर व सर्व संचालक मंडळ यांनीही प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता दोन मिनिटांत दाखल होईल FIR, नागपूर पोलिसांनी AI च्या मदतीने विकसीत केली नवी प्रणाली..

Mumbai News: पुन्हा मराठा आरक्षणाचा घाट कशासाठी? विरोधकांचा न्यायालयात युक्तिवाद

IPO नियमांमध्ये मोठा बदल! कंपन्यांना शेअर बाजारात लिस्टिंग सोपे होणार; केंद्र सरकारकडून नवी सुधारणा

Asiatic Election: एशियाटिक निवडणूक आणखी लांबणीवर! मतदार यादीतील गोंधळ कायम, निवडणूक पुन्हा स्थगित; नवीन तारीख काय?

Nashik Gram Panchayat : सरपंच प्रशासकांना आर्थिक 'पॉवर' आहे का? नाशिकमधील ५८४ ग्रामपंचायतींच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह

SCROLL FOR NEXT