कोकण

जिल्ह्यात श्रमदानातून बांधले ५२३ बंधारे

CD

-rat७p१२.jpg-
P२४N३०१२०
रत्नागिरी ः श्रमदानातून बंधारा बांधण्यासाठी एकवटलेले ग्रामस्थ.
---------

जिल्ह्यात श्रमदानातून बांधले ५२३ बंधारे

जिल्हा परिषद ; उन्हाळ्यातील गैरसोयींवर उतारा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : ''पाणी अडवा, पाणी जिरवा'' या संकल्पनेतून जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत दरवर्षी श्रमदानातून बंधारे उभारले जातात. यंदाही जिल्ह्यात साडेआठ हजार बंधाऱ्यांचे लक्ष्य निश्चित केलेले आहे. विधानसभा निवडणुकीमुळे विलंबाने सुरू झालेल्या या मोहिमेतून आतापर्यंत ५२३ बंधारे श्रमदानातून बांधण्यात आले आहेत. त्यामुळे एप्रिल, मे या उन्हाळ्याच्या कालावधीत पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.
उशिरापर्यंत पाऊस आणि लांबलेले बंधारे, त्यामुळे जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईही लांबण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गावातून वाहणारे नाले, वहाळ आणि उपनद्या यावर तात्पुरते बंधारे बांधून त्या पाण्याचा उपयोग करण्यात येत आहे. श्रमदानातून हे बंधारे उभारले जात आहेत. त्यामध्ये २८० कच्चे बंधारे, ८४ वनराई बंधारे तर १५६ विजय बंधारे आहेत. जिल्ह्यासाठी ८ हजार ६६५ बंधाऱ्यांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. बंधाऱ्यांतील पाण्याचा उपयोग सिंचनासाठी, कपडे धुणे, गाई-गुरांसाठी केला जातो तसेच बंधारा बांधल्यानंतर अडलेले पाणी जमिनीत जिरते आणि किनाऱ्यावरील विहिरींची पाणीपातळीही वाढण्यास मदत होते. एप्रिल, मे महिन्यात कडाक्याच्या उन्हात पाणीपातळी कमी होते. काही ठिकाणी विहिरी पूर्णतः कोरड्या त्या वेळी पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. बंधाऱ्यातील पाण्यामुळे अनेक विहिरे पाणी उशिरापर्यंत वापरण्यास मिळत आहे. काही गावांमध्ये कच्चे बंधारे विहिरे पाणीपातळी वाढवण्याच्या उद्देशाने उभारले जातात. गेल्या दोन वर्षांत गावागावांत पाणीयोजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
----
जिल्ह्यातील स्थिती
*तालुका* कच्चे बंधारे* वनराई बंधारे*विजय बंधारे
• मंडणगड* १७* ६* ०
• दापोली* ०* १०* ८६
• खेड* ३५* २* ९
• गुहागर* ०* १९* ११
• चिपळूण* ९५* ०* २४
• संगमेश्वर* २५* १०* ८
• रत्नागिरी* २६* १६* ०
• लांजा* ६५* १५* १८
• राजापूर* १७* ६* ०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

नवीन कर्णधार? वैभव सूर्यवंशीची संघात एन्ट्री! LA Olympics अन् ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२८ साठी कसा असेल भारताचा संघ? बरेच पर्याय उपलब्ध

Naman Awards 2026: स्मृती मानधना सलग ५ व्यांदा ठरली सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू; BCCI ने जाहीर केली पुरस्कारांची यादी

हम साथ साथ है फेम अभिनेत्रीचा सख्ख्या बहिणीनेच केला विश्वासघात ! नवरा तर पळवलाच पण संपत्तीही हडपली

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

SCROLL FOR NEXT