काव्याच्या उपचारांसाठी
शेळके कुटुंबीयांना मदत
तळेरे, ता. ७ : येथील ‘एक हात मदतीचा’ ग्रुपकडून आचरा येथील काव्या शेळके कुटुंबाला तातडीने ११ हजारांची मदत करण्यात आली. काव्यावर सध्या गोवा बांबुळी येथे उपचार सुरू असून तिला आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे सोशल मीडियावर माहिती मिळाल्यावर ही मदत करण्यात आली. तळेरे येथील काही तरुण एकत्र येत ‘एक हात मदतीचा’ या नावाखाली सामाजिक अथवा गरजू व्यक्तींना मदत करतात. या ग्रुपमध्ये आप्पा कल्याणकर, स्वप्नील कल्याणकर, अनिरुद्र लवेकर, साई डंबे, उद्धव महाडिक, आदित्य महाडिक, भूषण चव्हाण, छोट्या कल्याणकर, मनीष पिसे, मनोज पाटील, निखिल पिसे, नीलेश सोरप, पप्या कल्याणकर, सचिन पावसकर, सागर डंबे यांचा समावेश आहे. या मदतीबद्दल शेळके कुटुंबीयांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.