- rat९p५.jpg
P२४N३०३८९
- साडवली ः देवरूख, पाटगाव रस्त्याच्या बाजूपट्टीवर उभारलेले विद्युतखांब.
पाटगाव रस्त्याच्या बाजूपट्टीवर विद्युतखांब
ठाकरे शिवसेनेचा विरोध; बांधकामाच्या परवानगीबाबत साशंकता
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. ११ : पाटगाव येथे उभारण्यात येणारे महावितरणचे खांब रस्त्याजवळ उभारू नयेत, अशी मागणी उबाठा शिवसेनेचे अजित गवाणकर यांनी केली होती; मात्र महावितरणने रस्त्याच्या बाजूपट्टीतच हे खांब उभे केले आहेत. त्यासाठी बांधकाम विभागाची परवानगी घेतली की, नाही याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.
देवरूख-रत्नागिरी मार्गावर पाटगाव येथे महावितरणतर्फे विद्युतखांब उभारले जात आहेत. ते खांब रस्त्याजवळ न उभारता बाजूपट्टी व गटार सोडून उभारण्यात यावेत, अशी मागणी अजित उर्फ छोट्या गवाणकर यांनी महावितरणकडे केली होती. देवरूख ते पांगरी रस्ता हा चांगला झाल्यामुळे या मार्गावर वाहनांचा वेग वाढला आहे. या मार्गावर दुचाकींचे अनेक अपघात झाले आहेत. महावितरणच्या पोलवर दुचाकीस्वार धडकले आहेत. भविष्यात हे अपघात टाळण्यासाठी महावितरण विभागाने हे खांब रस्त्यालगत न उभारता गटार सोडून उभारावेत, अशी मागणी गवाणकर यांनी केली होती.
---
कोट
सध्या उभारण्यात आलेले हे खांब रस्ता साइडपट्टीवरच उभारलेले आहेत. त्या खांबांमुळे अपघात झाल्यास याची पूर्ण जबाबदारी महावितरण व बांधकाम विभागाची राहील.
- अजित गवाणकर, माजी सभापती, शिवसेना उबाठा
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.