कोकण

उदय सामंत मंत्री निश्चित, खात्याबाबत उत्सुकता

CD

उदय सामंत यांना मंत्रीपदाची संधी

पदाबाबात उत्सुकता ; कार्यकर्त्यांच्या नजरा मुंबईकडे
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहेत. उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांचे मंत्रिमंडळातील स्थान निश्चित मानले जात आहे. त्यांना कोणते खाते मिळणार, याची कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ४ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार, याबाबतची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या सरकारमध्ये ते पर्यावरणखात्याचे मंत्री होते. शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू भक्कमपणे मांडली आहे. रामदास कदम यांना मंत्रिपद दिल्यास पुढे सहा महिन्यात त्यांना विधान परिषदेवर घ्यावे लागणार आहे. त्यासाठी शिंदे यांना कसरत करावी लागेल. शेवटच्या क्षणी ते दापोलीतून निवडून आलेले योगेश कदम यांना राज्यमंत्रिपद मिळावे यासाठी प्रयत्न करतील. रामदास कदम यांचे दुसरे चिरंजीव सिद्धेश कदम यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्याचाही विचार केला जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या कोट्यातून चिपळूणचे आमदार शेखर निकम मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. पक्षाने दिले तर ठीक नाहीतर मी पक्षावर नाराज नाही. मंत्रिपद नाही म्हणून कोणतेही काम थांबत नाही. त्यामुळे मंत्रिपदासाठी लॉबिंग करून सरकारमधील मित्रपक्षाची नाराजी ओढून घेण्याची तयारी निकम यांची नाही. राजापूर विधानसभा मतदार संघातून पहिल्याच प्रयत्नात निवडून आलेले किरण उर्फ भैया सावंत यांना राज्यमंत्रिपद मिळावे, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. जिल्ह्यात किती आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, हा सस्पेन्स १५ तारखेलाच संपणार आहे. गुरूवारी शपथविधी झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीमधील तीन नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पदांचे निकष ठरवण्यात आले आहेत. काही पदांचा मार्ग मोकळा झाल्याने कदाचित ११ डिसेंबरलाही उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असल्याचीही चर्चा आहे.
...
सस्पेन्स कायम राहणार
मंत्रिपदासाठी नाव निश्चित झाल्यास कार्यकर्त्यांना शपथविधीसाठी निमंत्रण केले जाणार आहे. त्यामुळे त्या निरोपाची वाट असंख्य कार्यकर्ते पाहत आहेत; पण नेत्यांकडूनही थेट उत्तर मिळत नसल्याने या कार्यकर्त्यांच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये १५ डिसेंबरपर्यंत सस्पेन्स कायम राहणार आहे.
...
कोट
संघर्षाच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामागे शिवसेना नेते रामदास कदम उभे राहिले. दापोली विधानसभा मतदार संघात संघर्ष करून योगेश कदम यांनी विजय खेचून आणला. या दोघांपैकी एकाला मंत्रिमंडळात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्याय द्यावा.

- अरूण चव्हाण, तालुकाप्रमुख शिवसेना, खेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : नगर-श्रीगोंदा मार्गांवर तेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT