rat१०p९.jpg -
२४N३०६२९
राजापूर ः आमदार किरण सामंत यांचा सत्कार करताना गोठणे दोनिवडे ग्रामविकास मंडळ मुंबईचे पदाधिकारी.
गोठणे दोनिवडे मंडळाचे कार्य कौतुकास्पद
किरण सामंत ः १६ वा वर्धापनदिनानिमित्त मुंबईत स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ ः गेली १६ वर्ष विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या राजापुरातील गोठणे दोनिवडे ग्रामविकास मंडळ मुंबईचे कार्य कौतुकास्पद आहे. ज्या वेळी मंडळाला मदत लागेल तेव्हा मी तुमच्या पाठीशी असेन, असे आश्वासन आमदार किरण सामंत यांनी गोठणे दोनिवडे ग्रामविकास मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिले.
तालुक्यातील गोठणे दोनिवडे येथील मुंबई ग्रामविकास मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई येथे स्नेहमेळावा झाला. मंडळाचे अध्यक्ष मनोहर नाचणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला आमदार सामंत उपस्थित होते. या वेळी त्यांच्यासह नमन लोककला संस्थेचे (भारत) अध्यक्ष रवींद्र मटकर, अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाचे सरचिटणीस संतोष जोगले, अध्यक्ष अनिल भोवड, कुणबी सहकारी बँकेचे संचालक संतोष चौगुले, श्रमसाफल्य पतसंस्थेचे अध्यक्ष राजाराम राघव, भास्कर चव्हाण, मारूती नेमण, राजेंद्र धुमक, विश्वास राघव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रसंगी आमदार सामंत म्हणाले, राजापूर-लांजा-साखरपावासियांनी मतदानातून भरभरून प्रेम दिले असून, त्यांची सेवा करून अपेक्षापूर्ती करेन. या वेळी आमदार सामंत यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावप्रमुख राघव यांनी केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.