कोकण

कळवंडेत लोकसहभागातून वनराई बंधारा

CD

30769

कळवंडेत लोकसहभागातून वनराई बंधारा
चिपळूण, ता. ११ ः तालुक्यात गावागावांत वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडवण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कळवंडे-सात्विणवाडी येथे लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह महिला, ग्रामस्थांनी श्रमदान केले.
विविध प्रकारच्या भाजीपाला उत्पादनात अग्रेसर अशी कळवंडेची ओळख आहे. येथे बहुतांश शेतकरी व्यावसायिक शेतीला प्राधान्य देतात. गावात चाकरमान्यांची संख्याही फार कमी आहे. आंबा आणि काजूसह येथील शेतकरी व्यावसायिक शेतीला नेहमीच प्राधान्य देतात. भाजीपाला, चिबूड, काकडी उत्पादनातून कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळत असल्याने प्रतिवर्षी त्याचे उत्पादन घेतात. परे, ओढ्यातील साठवलेले पाणी शेतीला लाभदायी ठरते. त्यासाठी कळवंडे ग्रामपंचायतीने बंधाऱ्यासाठी केलेल्या आवाहनास ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. सात्विणवाडी पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीजवळ हा बंधारा घालण्यात आला. लोकसहभागातून घातलेल्या या बंधाऱ्यात चांगला पाणीसाठा झाला आहे. हा बंधारा शेतीसह पाणी योजनेला लाभदायी ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon मुंबई-नागपूर महामार्गावर अर्टिगा कारने चौघांना उडवलं, दोन नंबर प्लेट अन् गाडीत पोलिसांच्या काठ्या

Kim Jong Un missile test : किम जोंग उन अमेरिका -इराण युद्धात उतरणार? क्षेपणास्त्रांच्या केल्या चाचण्या, किम जोंग यांची मुलगी उपस्थित

Stock Market Today: तेलामुळे शेअर बाजार कोसळला! पण गॅस संकटामुळे या कंपन्यांचे शेअर्स 10 मिनिटांत 11% वाढले

Bhandara Accident: सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्याचा भंडाऱ्यामध्ये अपघाती मृत्यू; खानावळीत जेवण करून दुचाकीवरून घरी निघाले अन्..

Kolhapur MPSC Candidate :भावी अधिकाऱ्यांचा जीव लागला टांगणीला; राज्यसेवा परीक्षेचा निकाल प्रलंबित, यादी प्रसिद्ध न झाल्याने अस्वस्थता

SCROLL FOR NEXT