कोकण

-जिल्ह्यात दिमाखात धावताहेत 16 परदेशी वाहने

CD

जिल्ह्यात धावताहेत १६ परदेशी वाहने

आरटीओंकडे नोंद ; अडीच कोटींची मोटार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : अबब... अडीच कोटीची चारचाकी कार आणि नऊ लाखाची दुचाकी रत्नागिरीत. रत्नागिरीकरांसाठी हे नवल आणि कुतुहलच. कारण मुंबई, पुणे, नाशिक अशा मेट्रो सिटीमध्ये अशा अलिशान, महागड्या आणि इम्पोर्टड गाड्यांची क्रेझ आहे. परंतु हिच क्रेझ रत्नागिरीतील तरुणाईमध्येही आहे, असे म्हटलं तर पटणार नाही, पण हे खरं आहे. परदेशी बनावटीची १६ वाहने जिल्ह्याच्या रस्त्यावर दिमाखात धावत आहे. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात या वाहनांची नोंद आहे.
सिनेसृष्टीमधील मोठ मोठे अभिनेते, क्रिकेटपट्टू आदींध्ये महागड्या आणि परदेशी बनावटीच्या जास्त सीसीच्या कार आणि बाईकची मोठी क्रेझ असते. मुंबई, पुणे, नाशिक, आदी मोठ्या शहरांमध्ये ती क्रेझ पहायला मिळत होती. परंतु रत्नागिरीत अशा महागड्या आणि परदेशी बनावटीच्या गाड्या आहेत याच्यावर विश्वास बसणार नाही, परंतु रत्नागिरीतही महागड्या आणि परदेशी गाड्यांची हौस असलेले अनेकजण आहेत हे स्पष्ट झाले आहे. मोठे उद्योजक, व्यावसायिकांकडे आलिशान इम्पोर्टड गाड्या दिसू लागल्या आहेत. त्यामुळे करोडो रुपयांच्या गाड्या आता दिमाखात रत्नागिरीतील रस्त्यांवरून धावू लागल्या आहे.
रत्नागिरीत एक कोटीपेक्षा अधिक किमतीच्या तीन कार आहेत, तर सुमारे साडेनऊ लाखांची दुचाकीही आहे. जिल्ह्यातील तीन श्रीमंत व्यक्तींकडे इम्पोर्टेड कार आहे. यापैकी एका कारची किंमत २ कोटी ३६ लाख, तर दुसरीची १ कोटी २४ लाख आणि तिसरी कार १ कोटी ४ लाखांची आहे. जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यात १६ परदेशी वाहनांची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे झाली आहे.
---
कर किमतीच्या २० टक्के
परदेशी वाहनांची नोंदणी देशात करावयाची झाल्यास त्यासाठी २० टक्के कर भरावा लागतो. तसेच रस्ता सुरक्षा करही भरावा लागतो. रत्नागिरीत सर्वाधिक किमत असलेल्या कारला २० लाख कर आणि ४० हजार रस्ता सुरक्षा कर जादाचा भरावा लागला.
----------
कोट...
परदेशी बनावटीच्या इम्पोर्टेड वाहने असतील तर त्यांना त्या वाहनांच्या किमतीच्या २० टक्के कर भरावा लागतो. रत्नागिरीत गेल्या ११ महिन्यांत अशा १६ परदेशी वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. यात दोन कार आणि १४ दुचाकी आहेत.
- अजित ताम्हणकर, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

SCROLL FOR NEXT