कोकण

संगमेश्वर-पाटण घाटमार्गाचे जानेवारीत सर्व्हेक्षण

CD

-rat११p३१.jpg-
P२४N३०९२५
संगमेश्वर ः संगमेश्वर-पाटण घाटमार्गासाठी सोमवारी पाहणी करण्यात येणार आहे.
----------

संगमेश्वर-पाटण घाटमार्गाचे जानेवारीत सर्व्हेक्षण

कार्यारंभ आदेश अंतिम टप्प्यात; सोमवारी कार्यकारी अभियंता करणार पाहणी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ११ ः तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गापासून सुरू होणाऱ्या संगमेश्वर-पाटण घाटमार्ग सर्व्हेक्षण कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामाचा कार्यारंभ आदेश अंतिम टप्प्यात आला आहे. संगमेश्वर ते पाटण या ४६ किमीमधील लांबीच्या सर्व्हेक्षणाचे काम मोनार्च सर्व्हेअर्स ॲण्ड इंजिनिअरिंग कन्सल्टंट लिमीटेड या कंपनीला देण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम उत्तर रत्नागिरी कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांच्या उपस्थितीत मोनार्च कंपनीच्या तांत्रिक टीमची बैठक १६ डिसेंबरला होणार आहे. या बैठकीत सर्व्हेक्षण कामाचे नियोजन ठरणार असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. जानेवारी २०२५ मध्ये येथील सर्व्हेक्षणाला सुरवात होऊन सर्व्हेक्षण अहवालातून तयार झालेला डीपीआर शासनाला सादर होणार आहे. संगमेश्वर-पाटण घाटमार्ग कामासाठी समन्वय संतोष येडगे यांचा पाठपुरावा सुरू असून त्यांच्या पाठपुराव्याला यश येत आहे.
संगमेश्वर ते चाफेर (पाटण) हा एकूण ४६.६०० किमीचा रस्ता आहे. यापैकी २६.६०० किमी एकेरी रस्ता तयार असून फक्त २० किमी रस्ता तयार करावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा हद्दीतील ५.५०० किमी तर, सातारा जिल्हा हद्दीतील १४.६०० किमी अंतरामधील रस्ता शिल्लक आहे. या कामाला तातडीने मंजुरी मिळण्यासाठी शासनदरबारी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत असल्याचे समन्वयक येडगे यांनी सांगितले. संगमेश्वर–पाटण घाटमार्ग डीपीआरसाठी महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी २०१८ या अर्थसंकल्पीय वर्षात ५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. डीपीआरसाठी तरतूद केलेल्या निधीसाठी आमदार शेखर निकम यांनी विशेष पाठपुरावा केला होता.
-------
सह्याद्रीतील गावांना फायदा

संगमेश्वरपासून सुरू होणाऱ्या या घाटमार्गाचा कोसुंब, करंबेळे, वाशी, धामणी, तुरळ, आरवली, कसबा, कारभाटले, नायरी, अणदेरी, मासरंग, चिखली, तांबेडी, शेनवडे, शेंबवणे, कडवई, कुंभारखाणी, कुचांबे, राजिवली, कुटगिरी, रातांबी, कोंडीवरे, माखजन, करजुवे, असुर्डे, नांदगाव, येगांव, कुटरे, तळवडे, गोवळ, पाथे आदी आणि खाडीपट्ट्यातील, सह्याद्री रांगांमध्ये वसलेल्या असंख्य गावे आणि परिसरातील गावांमधील लाखो नागरिकांना फायदा होणार असून पुणे, सातारा या ठिकाणी जाण्यासाठी हा मार्ग जवळचा ठरणार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्याने वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे.
---
१९९९ मध्ये युती सरकारकडून भूमीपूजन

संगमेश्वर-पाटण घाटमार्ग कामाचे भूमीपूजन १९९९ मधील युती सरकारच्या काळात झाले होते. सध्या महायुती सरकार सत्तेत आहे आणि याच सरकारच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण व्हावा, अशी जनतेची अपेक्षा आहे. या घाटमार्गासाठी दोन्ही जिल्ह्यांतील ४ लाखांपेक्षा अधिक जनता आग्रही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रेमभंग म्हणजे धोका नाही; सहमतीने संबंधानंतर लग्नास नकार दिल्यास तो बलात्कार ठरत नाही, फसवणुकीची खरी व्याख्या HC ने सांगितली!

Mumbai Indians IPL 2026 Schedule: मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर फक्त दोन सामने खेळणार; जाणून घ्या RCB, RR, KKR अन् DC ला केव्हा व कुठे भिडणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सेवानिवृत्ती वयोगटात बदल, अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

SCROLL FOR NEXT