कोकण

रूळावरून उतरलेली रेल्वे बोगी पूर्ववत करण्याचे प्रात्यक्षिक

CD

- rat११p२९.jpg-
P२४N३०९१३
रत्नागिरी ः संकटकाळात मदत करण्यासाठीचे प्रात्यक्षिक करून दाखवताना एनडीआरएफ आणि कोकण रेल्वेची टीम.
-----------
एनडीआरएफ, कोकण रेल्वेची प्रात्यक्षिके

रेल्वे बोगी पूर्ववत करण्याचे धडे ; अत्याधुनिक उपकरणाचा वापर

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः कोकण रेल्वे मार्गावरून खाली उतरलेल्या रेल्वे बोगीला पूर्ववत मार्गावर आणण्यासह अत्याधुनिक उपकरणाच्या साह्याने रेस्क्यू ऑपरेशन कसे केले जाते, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. एनडीआरएफ आणि कोकण रेल्वेच्या टीमने रत्नागिरी रेल्वेस्थानकात करून दाखवले. अशा आपत्कालीन स्थितीत तत्काळ निर्णय घेत त्यावर मात करणे सोपे जाणार आहे.
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात झालेल्या या प्रात्यक्षिकावेळी जिल्हा प्रशासनातील विविध खात्यांचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर सर्वप्रथम जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांना सतर्क करावे लागते. परिस्थिती गंभीर असेल तर अशा स्थितीत एनडीआरएफच्या टीमला पाचारण केले जाते. नुकतीच एनडीआरएफच्या एका टीमने रत्नागिरी जिल्ह्याला भेट देत कोकण रेल्वेसह विविध विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसमोर विविध प्रात्यक्षिके सादर केली. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाच्यावतीने आयोजन केले होते. एनडीआरएफच्या पथकाने कोकण रेल्वेच्या परिसरात आपत्कालीन स्थितीत त्यांची टीम कशा पद्धतीने काम करते, अडचणीच्या ठिकाणी अडकलेल्या व्यक्तीची कशी सुटका करते आणि त्यांना उपचारासाठी पाठवले जाते याची प्रात्यक्षिके सादर केली. कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनीही या वेळी प्रात्यक्षिके दाखवली. या वेळी जिल्हा प्रशासनचा आपत्कालीन विभाग, तहसीलदार कार्यालय, नगरपालिका अग्निशमन पथक, जिल्हा आरोग्य विभाग, नागरी संरक्षण दल, पोलिस दल, रेल्वे सुरक्षादलाचे जवान असे विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी कोकण रेल्वेच्यावतीने रेल्वेचे मुख्य संरक्षा अधिकारी नंदू तेलंग व उपमुख्य संरक्षा अधिकारी बी. जी. मदनायक, विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांनी एनडीआरएफचे वरिष्ठ अधिकारी राजू गौड व जवानांचे स्वागत केले. एनडीआरएफचे २५ जवान या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाले होते.
---
परस्पर समन्वयावर बैठकीत चर्चा
कोकण रेल्वेच्या विभागीय कार्यालयात एनडीआरएफ आणि विविध खात्यातील अधिकाऱ्यांची विशेष बैठक झाली. त्यामध्ये आपत्कालीन स्थितीत निर्माण होणारी स्थिती, घ्यायचे निर्णय, खात्यांमधील परस्पर समन्वय यावर चर्चा करण्यात आली तसेच समन्वयाने काम करण्याबाबत चर्चा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT