कोकण

''ब्ल्यू फ्लॅग'' पर्यटनाची नांदी ठरेल

CD

30941

‘ब्ल्यू फ्लॅग’ पर्यटनाची नांदी ठरेल
निवतीतील सभेत सुरः प्रकल्पास ग्रामस्थांचा पाठिंबा
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ११ः ‘ब्ल्यू फ्लॅग’ प्रकल्पासाठी मेढा निवती किनाऱ्याची निवड झाल्यास येथील निसर्गसौंदर्य जगाच्या कानाकोपऱ्यात जाईल. मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मत निवती मेढा येथे आयोजित सभेत व्यक्त करण्यात आले. या प्रकल्पास ग्रामस्थांनी पाठिंबा देत पाठपुराव्यासाठी मेढा निवती ग्रामपंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभा मंगळवारी (ता. १०) सरपंच अवधूत रेगे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडली. या सभेत ‘ब्ल्यू फ्लॅग प्रकल्प मानांकन’ या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी सरपंच रेगे यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे, मेढा निवती पोलिसपाटील जोगेश सारंग, सदस्य तृप्ती कांबळी, नमिता घाटवळ, शीतल पाटकर, माधुरी कोचरेकर, इतर ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात मुख्यतः मेढा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील निवती किनारी येणाऱ्या ब्ल्यू फ्लॅग प्रकल्प मानांकन या विषयावर चर्चा करण्यात आली. अलीकडेच पर्यावरण अधिकाऱ्यांकडून ब्ल्यू फ्लॅगसाठी निवती किनारी पाहणी करून चाचणी करण्यात आली. भविष्यात मेढा निवती किनारी मोठे प्रकल्प राबविण्यासाठी सकारात्मकता दर्शविण्यात आली. हा प्रकल्प कोणतीही हानी करणारा अथवा विनाशकारी नाही. स्थानिक मच्छीमारांच्या रोजगारावर याचा कोणताही परिणाम होणार नसून, या प्रकल्पासाठी मेढा निवती किनाऱ्याची निवड झाल्यास येथील निसर्गसौंदर्य जगाच्या कानाकोपऱ्यात जाईल. मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मत व्यक्त करण्यात आले. हा प्रकल्प राबविण्यासाठी उपस्थित ग्रामस्थांच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. प्रकल्पाच्या पाठपुराव्यासाठी ग्रामस्थांची कमिटी स्थापन करण्यात आली.
सभेचे सूत्रसंचालन व आभार ग्रामपंचायत अधिकारी शिंदे यांनी मानले. ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याने उपस्थित ग्रामस्थांचे सरपंच रेगे यांनी ग्रामपंचायतीच्यावतीने आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रामराव वडकुते कोण? राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी

'सावळ्याची जणू सावली' मध्ये होणार नव्या अभिनेत्रीची एंट्री; सावलीसमोर येणं आणखी एक संकट

Latest Marathi News Live Update : सलग पाचव्या दिवशी पुणे ते दुबई विमान रद्द

Maharashtra Export: युद्धामुळे महाराष्ट्राला फटका! जेएनपीए बंदरात सुमारे 2 हजार कंटेनर अडकले, निर्यातीवर परिणाम

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

SCROLL FOR NEXT