कोकण

राजापूर आगारासमोर अंडरपास, फ्लायओव्हर बांधा

CD

-rat११p१४.jpg -
२४N३०८७५
राजापूर ः मुंबई-गोवा महामार्गावर डेपोसमोरील रस्ता.
----------

राजापूर आगारासमोर ‘फ्लायओव्हर’ बांधा

सुरक्षितता धोक्यात ; भाजपाचे आरटीओला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १० ः मुंबई-गोवा महामार्गाचे एसटी डेपोसमोरील कामे रखडली आहेत. त्यामुळे या भागातून प्रवास करताना वाहनचालकांसह पादचारी, प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाच्यादृष्टीने धोका निर्माण झाला आहे. याकडे भाजपचे तालुका सरचिटणीस मोहन घुमे यांनी निवेदनाद्वारे उपप्रादेशिक परिवहन विभाग, महसूल आणि नगरपालिकेचे लक्ष वेधले आहे. एसटी डेपोसमोरील भागामध्ये सुरक्षितता आणि सुखरूप प्रवासाच्यादृष्टीने या ठिकाणी अंडरपास किंवा फ्लायओव्हर ब्रीजची उभारणी व्हावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले असून, शहरातील एसटी डेपोसमोरही चौपदरीकरणाचे काम करण्यात आले आहे; मात्र डेपोसमोरील चौपदरीकरणाचे काम अर्धवट आहे. या ठिकाणी सर्व बाजूंनी लोकवस्ती असून छोटेशी बाजारपेठही वसलेली असून तिचा विस्तारही होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह शाळकरी मुलांची नेहमीच रस्त्यावरून वर्दळ असते. या परिसरातील मध्यवर्ती भाग असलेल्या या ठिकाणी चारही बाजूंनी रस्त्यावरून वर्दळ असली तरी प्रवाशांसह वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यातून नाहक अपघाताला आमंत्रण मिळालेले असून, अपघाताची मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. भाजपचे तालुका सरचिटणीस घुमे यांनी निवेदनाद्वारे या रखडलेल्या कामाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून, त्यामुळे पुन्हा एकदा रखडलेले काम चर्चेत आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीत सुरुवात! सेन्सेक्स 800 अंकांनी वाढला; आज 2 मोठे IPO बाजारात

Latest Marathi News Live Update : आखाती देशांतील संघर्षाचा परिणाम; तेल कंपन्यांकडून ब्रॅण्डेड पेट्रोलचे दर वाढवले

Jalna News: जालना जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट; शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

Jalna News: जालना शेतकऱ्यांवर गारपीटचा मोठा फटका; रब्बी पिकांवर संकट

Koyna Dam Water Release : कृष्णाकाठची तहान भागणार! कोयना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू; 'या' तारखेला सांगलीत पोहोचणार पाणी

SCROLL FOR NEXT