कोकण

पिंगुळीतील विजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

CD

30968

पिंगुळीतील विजपुरवठा
सुरळीत करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः पिंगुळी गावामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पिंगुळीतील युवासेना (ठाकरे शिवसेना ) पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली. आठ दिवसात विजपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
पिंगुळी गावामध्ये पाऊस सुरू झाल्यापासून तासनतास विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत आहे.
या पार्श्वभूमीवर पिंगुळीतील युवासेना (ठाकरे शिवसेना ) पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी विद्युत वाहिन्यांवर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यात याव्यात, विज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली. याबाबतचे निवेदनही यावेळी सादर करण्यात आले. या समस्यांची येत्या आठ दिवसात दखल न घेतल्यास युवासेनेच्यावतीने महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दीपक गावडे, बाबल गावडे यांनी दिला. यावेळी पिंगुळी विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, युवा सेना तालुका सचिव केतन शिरोडकर, दीपक गावडे, बाबल गावडे, मिलिंद परब, हेमंत पिंगुळकर, तुळशीदास पिंगुळकर, दीपक धुरी, केदार रासम, अजय बांदेकर, भरत परब, कपिल म्हापसेकर, धनंजय पेडणेकर, राजन पुरलकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT