कोकण

चिंदर येथे शनिवारपासून भगवती माऊली यात्रोत्सव

CD

swt1115.jpg
30945
श्री देवी भगवती माऊली

चिंदर येथे शनिवारपासून भगवती माऊली यात्रोत्सव
विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सेवा समितीतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ११ः चिंदर येथील श्री देवी भगवती माऊलीचा यात्रोत्सव १४ ते १८ डिसेंबर कालावधीत साजरा होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बारापाच मानकरी व श्री देवी भगवती माऊली सेवा समिती चिंदरतर्फे केले आहे.
शनिवारी (ता. १४) सकाळी ९ वाजता यात्रोत्सवास सुरुवात, दुपारी १२ वाजल्यापासून श्री देवी भगवती माऊलीस मानकऱ्यांतर्फे महाप्रसाद, रात्री ११ वाजता ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत रामेश्वर मंदिराकडून ग्रामदेवता तरंगांचे भगवती मंदिरात आगमन, रविवारी (ता. १५) पहाटे ३ वाजता पुराण गोंधळ व दिंडे जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवीच्या दिवट्यांचे नृत्य, सायंकाळी ५.३० पासून स्थानिक भजने होणार आहेत. यात श्री देव रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ देवूळवाडी, ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ साटमवाडी, रात्री ७.३० ते ८.३० पर्यंत गावडे पुरुष प्रासादिक भजन मंडळ गावडेवाडी यांचे भजन, रात्री ९ वाजता पुराण, कीर्तन, श्रींची आरती होणार आहे. सोमवारी (ता. १६) सायंकाळी ४ पासून श्री सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ सडेवाडी, गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ पालकरवाडी, वाडत्री ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ कोंड अपराजवाडी यांचे, रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ कुंभारवाडी यांची भजने, रात्री ९ वाजता पुराण, गोंधळ, आरती आदी कार्यक्रम होतील. मंगळवारी (ता. ११) ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ लब्देवाडी, ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ तेरईवाडी, आकारी ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ गावठणवाडी यांची भजने, रात्री ९ वाजता पुराण, गोंधळ, कीर्तन, आरती आदी कार्यक्रम, बुधवारी (ता. १८) दुपारी ३ ते ६ चालू वहिवाटदार सर्व महिलांमार्फत हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ६ वाजता पिसाळी ब्राम्हण देव प्रासादिक भजन मंडळ तेरई, भगवती प्रासादिक भजन मंडळ भटवाडी या स्थानिक मंडळांची भजने, रात्री १० वाजता जय हनुमान पारंपरिक दशावतारी नाट्य मंडळ ओरोस-दांडेली यांचे नाटक ''विंध्यवासिनी विंद्येश्वरी'', रात्री २.३० नंतर गोंधळ, कीर्तन, लळित समाप्ती व दिवट्या नृत्य आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन बारापाच मानकरी व श्री देवी भगवती माऊली सेवा समिती चिंदर यांच्यावतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: देशात पहिल्यांदाच! ३२ वर्षीय तरुणासाठी सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाला मंजुरी; काय आहे संपूर्ण प्रकरण?

शेतकऱ्याची जमीन हायवेत गेली, १.७७ कोटी मिळाले; पण १८ वर्षांच्या लेकानं गेमिंगमध्ये गमावले, फसवणूक झाल्यानं विष प्यायला

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला नवी गाडी घेताय? वाहन खरेदीसाठी अमृत वेळ, शुभ मुहूर्त, राशीनुसार योग्य रंग...सर्वकाही पाहा एका क्लिकवर

प्रसिद्ध मसाला ब्रँड वादाच्या भोवऱ्यात; चाचणीत ‘एंटरबॅक्टेरिएसी’ जिवाणू आढळल्याचा दावा, हा बॅक्टेरिया नेमका काय आणि आरोग्यासाठी किती धोकादायक?

Latest Marathi News Live Update : NCERT पुस्तकांच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT