कोकण

रत्नागिरीत झाले समग्र आरोग्यावर विचारमंथन

CD

योगाने शारीरिक, मानसिक स्वास्थ्य संतुलित राहते

हरेराम त्रिपाठी ः रत्नागिरीत समग्र आरोग्यावर विचारमंथन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : अष्टांग योगाच्या माध्यमाने शारीरिक, मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवणे शक्य असून उत्तम आरोग्यासाठी नियमांचे पालन आणि कृतीमध्ये सातत्य राखण्याची अत्यंत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे (रामटेक) कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी केले.
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक) भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन रत्नागिरी उपकेंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समग्र स्वास्थ्य विषयावर आधारित अध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते. समग्र स्वास्थ्य या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळेत राज्यातील ४० प्राध्यापक उपस्थित होते. उद्‍घाटनावेळी अॅड. आशिष आठवले, उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. गौरव कडलग म्हणाले, आजच्या आधुनिक युगात वावरत असताना कामाच्या आणि विविध जबाबदाऱ्यांच्या अतिरिक्त विचारामुळे व्यक्ती ताणाखाली येते आणि यामुळेच ती वैफल्य आणि चिंताग्रस्तदेखील होते; मात्र मन प्रसन्नता आणि सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी सतत योग करणे आवश्यक आहे. डॉ. अक्षता सप्रे यांनी सांगितले की, भारतीय वैद्यक शास्त्राचा कणा म्हणजेच आयुर्वेद आणि या आयुर्वेदाबाबत काही मिथक आणि तथ्य आहेत; मात्र आयुर्वेदाचा पुरस्कार करून त्याचा अवलंब करून जर अध्ययनात्मकदृष्टीने आपण त्याकडे पाहिलं तर निश्चितच आपल्या अनेक हिताच्या गोष्टी आयुर्वेदात आपल्याला दिसून येतील.
योगशिक्षक विनय साने म्हणाले, ॲक्युप्रेशर पॉईंट्स हे अलीकडे काही वर्षात विकसित झालेलं तंत्र आहे; मात्र याचा नेमका आणि योग्यप्रकारे वापर केला तरी याने हवा असलेला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. पंचकर्म ही आयुर्वेदातील महत्वाचे शुद्धीकरण आणि पुनरूत्थान उपचारपद्धती आहे. शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरणासाठी पंचकर्म चिकित्सा अत्यंत प्रभावी आहे, असे डॉ. पूजा निमकर म्हणाल्या तर होमिओपॅथी ही आधुनिक आरोग्य समस्यांवर उपयुक्त ठरते. या द्वारे दीर्घकालीन गंभीर आजारांवही प्रभावीपणे उपचार करणे शक्य असल्याचे डॉ. मधुसूदन वैद्य म्हणाले.
-------
आयुर्वेद पथ्यकर आहे तेच सांगतो

वैद्य पराग दाते म्हणाले, आयुर्वेद म्हटला की पथ्य आणि अपथ्य असाच विचार आपल्या मनात येतो; मात्र या दोन्ही बाबींचा सुक्ष्म विचार आयुर्वेदात दिसून येतो जे शरीरासाठी हितकारक आहे त्याच गोष्टींचा अंगीकार करणे म्हणजे थोडक्यात पथ्य आहे. त्यामुळे आयुर्वेद नेहमीच जे पथ्यकर आहे, ते सांगण्याची भूमिका घेतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT