swt1117.jpg
30958
बांदा ः दिव्य ज्योती प्रशालेत आयोजित मार्गदर्शन शिबिराला उपस्थित पालक व विद्यार्थी.
बांदा दिव्य ज्योती प्रशालेमध्ये
विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ११ ः येथील दिव्य ज्योती स्कूल प्रशालेत विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम झाला. यावेळी ठाणे येथील प्रसिद्ध मनशक्ती मार्गदर्शक, बालमानसशास्त्र अभ्यासक व करियर मार्गदर्शक आदित्य तेंडले यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी पालकांसाठी ''आधुनिक पालकत्व नातेसंबंध-समस्या आणि मार्ग ''या विषयावर विचार व्यक्त केले. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना व आपल्या पाल्याचे संगोपन करताना पालकांना येणारी आव्हाने आणि संधी, पालकांची जबाबदारी, पालक व पाल्य यांच्यातील भावनिक नातेसंबंधांचे महत्त्व, आवश्यकता आदी मुद्द्यांवर विवेचनातून तसेच कृती सत्रातून मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तणावमुक्त परीक्षा कशा द्याव्यात, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, आपले ध्येय कधी ठरवावे, त्यासाठी कसे प्रयत्न करावेत, करिअरच्या संधी कशा शोधाव्यात तसेच आपल्यातील ताकद व कमतरता कशी ओळखावी, यासंदर्भात मार्गदर्शन केले. पालकांनी डॉ. तेंडले यांच्याशी संवाद साधत आपल्या शंकांचे निरसन केले. या कार्यशाळेला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.