swt1118.jpg
30965
सावंतवाडी ः शेखर बांदेकर यांचा सत्कार करताना तहसीलदार श्रीधर पाटील, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद पाटील.
संयुक्त योगोपचार शिबिरास
सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्यावतीने येथे आयोजित केलेल्या संयुक्त योगोपचार शिबिराची आज सांगता झाली. सात दिवसांचे हे योग शिबिर येथील वैश्य भवन गवळी तिठा ५ ते ११ डिसेंबर या कालावधीत यशस्वीरित्या पार पडले. अनेक साधकांनी या शिबिरामध्ये सहभाग घेऊन योगाभ्यासाचा लाभ घेतला.
यावेळी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांच्या हस्ते पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी भारत स्वाभिमान माजी जिल्हा प्रभारी महेश भाट, अनिल मेस्त्री, रामनाथ सावंत, चंद्रशेखर नाईक, अरुण पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरामध्ये जिल्हा प्रभारी बांदेकर यांनी सतत सात दिवस शिबिर घेतल्यामुळे सर्व शिबिरार्थींनी आभार व्यक्त केले. वैश्यभ वन हॉलचे संचालक रमेश बोंद्रे यांनी शिबिराकरिता जागा, स्टेज, साऊंड सिस्टिम मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. शिबिरात सुमारे ७० ते ८० योग साधकांची दररोज उपस्थिती लाभली. दरम्यान, सावंतवाडी येथे उद्यापासून (ता. १२) सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केलेले आहे. त्यात सर्वांनी सहभाग घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने योगाभ्यास शिकावा, असे आवाहन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.