कोकण

विकासकामांसाठी कधीही हाक द्या

CD

swt1116.jpg
30990
माणगाव ः माजी आमदार वैभव नाईक यांनी गाठीभेटी कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

विकासकामांसाठी कधीही हाक द्या
वैभव नाईक ः माणगाव, घावनळे, बांबर्डेत गाठीभेटी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः कार्यकर्ते आणि जनतेच्या कामासाठी कायम उपलब्ध असणार, असे प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी माणगाव, घावनळे, बांबर्डे विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी कार्यक्रमात केले.
माजी आमदार नाईक यांनी सोमवारी (ता. ९) तालुक्यातील माणगाव, घावनळे, बांबर्डे या जिल्हा परिषद मतदारसंघांत दौरा करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. विधानसभा निवडणुकीत पाठीशी राहिल्याबद्दल कार्यकर्त्यांचे व जनतेचे त्यांनी आभार व्यक्त केले. कार्यकर्ते आणि जनतेच्या कामासाठी कायम उपलब्ध असणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला जिल्हा संघटक श्रेया परब, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला तालुकाप्रमुख स्नेहा दळवी, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर हे प्रमुख पदाधिकारी तसेच माणगाव येथे विभागप्रमुख बंड्या कुडतरकर, विभाग संघटक कौशल जोशी, रमा ताम्हाणेकर, माणगाव सरपंच मनीषा भोसले, उपसरपंच बापू बागवे, एकनाथ धुरी, आकेरी सरपंच महेश जामदार, उमेश परब, संतोष परब, अशपाक कुडाळकर, शेखर देऊलकर, मंगेश परब, अशोक बांबर्डेकर, अक्षय मांजरेकर, गणेश बोभाटे, सचिन भिसे, तर घावनळे येथे विभाग प्रमुख रामभाऊ धुरी, सुधीर राऊळ, पप्पू म्हाडेश्वर, वसोली सरपंच अजित परब, नीलेश सावंत, तुषार परब, बाबी निकम, रुपेश निकम, दादा ताम्हाणेकर, महेंद्र राऊळ, दीपक सावंत, महादेव रेगडे, आप्पा गोडके, रशीद परब, भाई घाडी, बांबर्डे येथे विभाग प्रमुख नरेंद्र राणे, विभाग संघटक संदीप सावंत, उपविभागप्रमुख प्रदीप गावडे, उपविभागप्रमुख मंगेश मर्गज, योगिता पवार, वेताळबांबर्डे सरपंच दळवी, युवासेना विभागप्रमुख कदम, जगदीश सरनोबत, महेंद्र पिंगुळकर, संतोष पिंगुळकर, मुकुंद सरनोबत, महेश गुरव, संतोष सावंत, भरत घाडी, धनंजय बिरमुळे, दिवाकर बागवे, अमोल सावंत, नितीन सावंत, विद्याधर मुंज, मुकेश पालव, बाबू मर्गज यांसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT