कोकण

रत्नागिरी ः अंमली पदार्थाविरोधात पोलिस अॅक्शन मोडवर

CD

अमली पदार्थांविरोधात
पोलिस अॅक्शन मोडवर

साध्या वेशात गस्त; जामिनावर असलेल्यांवर लक्ष

रत्नागिरी, ता. ११ : अमली पदार्थांविरोधात पोलिस दल अॅक्शन मोडवर आहेत. शहरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या मागावर पोलिस आहेत. ज्या ठिकाणी अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना यापूर्वी पकडण्यात आले आहे, त्या आरोपींसह सापळ्यात न अडकलेल्या तरुणांवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. साध्या वेशात पोलिस गवळीवाडा ते बाजारपेठ, चर्चरोड, राजीवडा, मिरकरवाडा जेट्टी, उद्यमनगर येथे गस्त घालणार आहेत. विक्रेतेच नव्हे, तर विक्री करणाऱ्या मुख्य गुन्हेगारांवर पोलिस लक्ष ठेवून आहेत.
माजी मंत्री तथा रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची गय करू नका, त्यांच्यावर कडक करवाई करा, अशा सूचना दिल्या होत्या. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अंमली पदार्थविरोधी कारवाया करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शहर पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा यांनी कडक करवाईला सुरुवात केली आहे. अमली पदार्थ विक्री करताना पकडलेल्या आणि जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींवर लक्ष ठेवले जात आहे. या गुन्ह्यातील काही आरोपी पुन्हा तोच व्यवसाय करून समाज स्वास्थ्य बिघडवत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
वस्तीच्या ठिकाणांसह रस्त्याच्या आडोशाला, गजबजलेल्या परिसरात अनेक जुने-नवीन तरुण अमली पदार्थ विकत आहेत. यासंदर्भात आमदार उदय सामंत यांच्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी यापूर्वीही कारवाया करण्यात आल्या आहेत.
----

चौकट...
पुन्हा... ये रे माझ्या मागल्या?
रत्नागिरी जिल्ह्यात वाहतुकीच्या वेगवेगळ्या मार्गाने मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ येतात. यापूर्वीदेखील जिल्हा परिषद येथे वडापच्या गाडीमधूनही गांजा आणल्याचे उघड झाले आहे. काही संशयितांना पकडले होते; परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ येतात कुठून, याचा माग लावण्यात मात्र पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे कारवाई झाली की, काही दिवस अमली पदार्थांची विक्री थांबते त्यानंतर पुन्हा सुरू होते, अशी स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

भारताला 'त्या' मोठ्या निर्णायानं बनवलं T20 World Cup चॅम्पियन, रिकी पाँटिंग स्पष्ट बोलला; सूर्याचंही केलंय कौतुक

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

Manmad Indore Railway Project : जोपर्यंत मोबदला जाहीर होत नाही, तोपर्यंत मोजणी नाही! मनमाड-इंदूर रेल्वे बाधित शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT