kan113.jpg
30984
कणकवली : येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ आशियेचे सरपंच महेश गुरव यांनी केला. यावेळी मुख्याध्यापक पिराजी कांबळे, प्राचार्य युवराज महालिंगे, भगवान लोके, आदी
दर्जेदार क्रीडापटू तयार होण्यासाठी
शालेय क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या
महेश गुरव : कणकवली केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ
कणकवली, ता. ११ : राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरून खेळाडू निर्माण होण्यासाठी शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धा ह्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने कुठल्या ना कुठल्या क्रीडा स्पर्धा प्रकारात सहभाग घ्यावा आणि आपल्यातील सुप्त गुणांना संधी द्यावी, असे आवाहन माजी उपसभापती आणि आशियेचे सरपंच महेश गुरव यांनी आज येथे केले.
कणकवली विद्यामंदिर हायस्कूलच्या मैदानावर आज कणकवली केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा शुभारंभ आशियेचे सरपंच महेश गुरव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आला. या वेळी कणकवली कॉलेजचे प्राचार्य युवराज महालिंगे, विद्यामंदिरचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, पत्रकार भगवान लोके, शिक्षक अच्युतराव वणवे, प्रा. हरिभाऊ भिसे, केंद्रप्रमुख के. एम. पवार, क्रेंद्र मुख्याध्यापिका सायली गुरव, सतीश कदम, रमेश डोईफोडे, पंच प्रमोद पवार, लक्ष्मण पावस्कर, अमित हर्णे, श्रीकांत बुचडे, मधुरा सावंत, वर्षा प्रभू, नेहा मोरे, शिल्पा सावंत, इंदू डगरे, विद्या लोकरे उपस्थित होते. यावेळी क्रीडा स्पर्धेबाबतची माहिती प्रतिज्ञा चैतन्य कदम यांनी घेतली. यावेळी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.