rat११p३७.jpg -
P२४N३०९८३
राजापूर ः गाळ उपशाचा प्रारंभ करताना भाजपचे ज्येष्ठ नेते महादेव गोठणकर. शेजारी आमदार किरण सामंत, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ.
-------
राजापुरामधील पुराचा धोका दूर करणार
आमदार किरण सामंत ः अर्जुना-कोदवलीतील गाळ उपशास सुरवात
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ ः राजापूर शहरावरील पुराची टांगती तलवार कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. भविष्यामध्ये गाळ उपशासाठी आवश्यक लागणारा निधी शासनाकडून मंजूर करून आणताना या दोन्ही नद्या गाळमुक्त करत राजापूर शहर पूरमुक्त करण्याचा आपला संकल्प असल्याचे प्रतिपादन आमदार किरण सामंत यानी केले. या वेळी स्पष्ट केले.
गाळ उपशाच्या कामाचा आज आमदार सामंत यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. सातत्याने येणऱ्या पुरामुळे राजापूरवासियांची डोकेदुखी ठरलेला अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळाचा उपसा यावर्षी करण्यात येत आहे. या कामासाठी शासनाच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक सन २०२४-२५ च्या अंतर्गत ६४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. सुमारे ६४ लाखांच्या मंजूर निधीपैकी जवाहर चौक कोदवली नदीपात्र ते पुढे गणेशविसर्जन घाटापर्यंत गाळ उपसा करण्यासाठी २४ लाख ८२ हजार ४६ रुपये तर अर्जुना नदीपात्रात कोंढेतड पूल ते राजीव गांधी क्रीडांगणापर्यंत गाळ उपसा करण्यासाठी ३८ लाख ७४ हजार ८११ रुपये इतका निधी मंजूर आहे. जलसंपदा विभागाच्यावतीने हा गाळ उपसा केला जाणार आहे.
या प्रसंगी राजापूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी चेतन विसपुते, जलसंपदा विभागाचे अभियंता रोहित पाटील, मुख्य लिपिक जितेंद्र जाधव आदींसह भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शहरातील व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
आवश्यक निधी आणणार
राजापूर शहरावर दरवर्षी पुराची टांगती तलवार असते. ती दूर करण्यासाठी गाळ उपसा करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारा आवश्यक निधी शासनाकडून मंजूर करून आणण्यात येईल. त्याआधारे अर्जुना-कोदवलीतील गाळ उपसा वेळीच केला जाईल असे आमदार किरण सामंत यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.