कोकण

अण्णा जाधवांच्या मोर्चात सहभाग टाळण्याची सूचना

CD

-ratchl११२.jpg
२४N३०९९६
ः चिपळूण ः बैठकीस उपस्थित पदाधिकारी.
-----------
अण्णा जाधवांच्या मोर्चात सहभाग टाळा

आंबेडकरी संघटनांची बैठक ; जमावबंदी आदेशाकडे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः वंचित बहुजन आघाडीचे अण्णा जाधव यांनी जाहीर केलेल्या गुरुवारच्या (ता. १२) मोर्चात सहभागी होऊ नये. जिल्हा प्रशासनाने २० डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. अशा स्थितीत जाधव लोकांना मोर्चात सहभागी होण्याकरिता भावनिक आवाहन करत आहेत. त्यांच्या आवाहनाला बळी पडून मोर्चात सहभागी होणाऱ्या आंदोलकांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिपळूण तालुक्यातील बौद्ध बांधवांनी मोर्चात सहभागी होणे टाळावे, असे आवाहन विविध सामाजिक संघटनांनी केले आहे.
आंबेडकरी चळवळीतील विविध सामाजिक संघटनांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अण्णा जाधव यांच्यावरील हल्ल्यातील संशयितांना पोलिस यंत्रणेने ताब्यात घेतले आहे. पोलिसांचा तपास प्रगतीपथावर आहे. थोड्याच दिवसात तपास पूर्ण होऊन सत्य समोर येण्याची शक्यता असताना जाधव आंदोलन करण्यावर ठाम आहेत. तालुक्यातील शांतता, सलोखा बिघडून जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून सामाजिक संघटनांनी बौद्ध समाज बांधवांना आवाहन केले; परंतु अण्णा जाधव यांनी नाहक टक्केवारी घेणारे व दलाली करणारे, असा खोटा व खोडसाळ आरोप तालुक्यातील सामाजिक संस्था व राजकीय कार्यकर्ते यांच्यावर केले आहेत. अण्णा जाधव यांनी केलेल्या आरोपाचे खंडण करण्यासाठी लवकरच तालुकास्तरावर भव्य मेळावा घेऊन अण्णा जाधव यांचे खरे रूप लोकांसमोर मांडले जाईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.
तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन हितसंरक्षण समिती, बौद्धजन पंचायत समिती आणि मातंग समाज संघटना यांनी तालुक्यातील जनतेचे सदरील मोर्चात सहभागी होऊ नये अन्यथा पुढील कायदेशीर कार्यवाहीत समाजाचे सहकार्य मिळणार नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले. बैठकीला चंद्रकांत सावंत, जयरत्न कदम, महेश सावंत, विनोद कदम, संदेश मोहिते, सुशांत जाधव, सुभाष मोहिते, जगदीश कांबळे, श्रीधर सकपाळ, विलास जाधव, नाना सावंत, काशिराम कदम, प्रशांत मोहिते, रमण मोहिते, चंद्रकांत जाधव, सुधाकर पवार, सुदेश गमरे, सचिन मोहिते, सुनील सावंत, सुरेश भिसे, संजय गमरे आदी उपस्थित होते.
--
चौकट
मोर्चात धम्म संघटनांचा सहभाग नाही
गुहागर : वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्यावतीने गुरुवारी (ता. १२) गुढेफाटा ते प्रांत कार्यालय चिपळूण असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात गुहागर तालुक्यातील बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर आणि भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटना सहभाग घेणार नाहीत, असा स्पष्ट खुलासा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
---
भास्कर जाधवांवरील आरोप खोटे

ठाकरे गटातर्फे निवेदन ; मतदानावर परिणाम करण्याचा खटाटोप

सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ११ : वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांनी भास्कर जाधव यांच्यावर केलेले आरोप खोटे व जाणीवपूर्वक बदनामी करणारे होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार असलेल्या जाधव यांचे नाव घेऊन बदनाम करून त्यांच्या मतदानावर जाणीवपूर्वक परिणाम करता येईल, असे कृत्य घडवले गेले आहे. त्यांचा खोटारडेपणा जनतेसमोर जाहीरपणे उघड व्हावा, असे निवेदन गुहागर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने मंगळवारी गुहागर पोलिसांना देण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान गुहागर तालुक्यामध्ये १७ नोव्हेबरला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर तालुक्यातील नरवण येथे प्राणघातक हल्ला झाला. सदर घटना विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात भास्कर जाधव यांनीच घडवल्याचा बिनबुडाचा आरोप फिर्यादी विकास उर्फ अण्णा जाधव यांनी जाहीरपणे केला. उमेदवार जाधव यांच्या मतदानावर परिणाम होणारे हे कृत्य केले व त्यातून आम्हाला खूप त्रास झाला. या घटनेची तत्काळ दखल घेऊन जनतेसमोर वेळीच सत्य काय ते आणणे आवश्यक होते; परंतु उशीरा का होईना, यातील संशयितांना नुकतेच पकडण्यात आले. त्यामुळे या प्रकरणांतील आणखी काहीजणांचा सहभाग आहे. त्यांना तत्काळ अटक करून या प्रकरणाचे सत्य जनतेसमोर आणावे. यामुळे भास्कर जाधव यांच्यावरील आरोप खोटे होते, हे सिद्ध होईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी तालुकाप्रमुख सचिन बाईत, प्रवीण ओक, रवींद्र आंबेकर, राज विखारे, सोहम सातार्डेकर, राजाराम गुहागरकर, सतीश शेटे, सारिका कनगुटकर, संगीता वराडकर, आदेश मोरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT