कोकण

चिपळुणात सहाव्या मजल्यावरही मुबलक पाणी

CD

३०९६४


सहाव्या मजल्यावरही मुबलक पाणी
चिपळुणात ग्रॅव्हिटी योजना ः स्वप्न लवकरच सत्यात उतरणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः कोळकेवाडी धरणातून शहराला शुद्ध व मुबलक पाणी मिळणार आहे. तब्बल २० वर्षांनी या धरणातून ग्रॅव्हिटी पाणी योजनेचे चिपळूणकरांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. २०४६ पर्यंत शुद्ध व मुबलक पाणी मिळत राहील, अशी रचना या योजनेत केली आहे. भविष्यातील लोकसंख्या गृहित धरून सुमारे ६.०७०८ दशलक्ष घनमीटर इतक्या प्रमाणात या योजनेतून पाणीपुरवठा संपूर्णपणे ग्रॅव्हिटी स्वरूपात केला जाणार असल्याने ही योजना फायदेशीर ठरणार आहे.
चिपळूण पालिकेने १९९२ मध्ये राबवलेली सुधारित नळपाणी योजना काही वर्षातच अडचणीत आली. वाढत्या शहरीकरणामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. शिवाय कायम मचूळ, खारट चवीचे पाणी, कमी दाबाने पाणीपुरवठा या समस्या वेळोवेळी उपस्थित होऊ लागल्या. सातत्याने दुरुस्ती करावी लागल्याने पाणीयोजना पांढरा हत्ती ठरत आहे. पाणीपट्टी स्वरूपात पालिकेला दरवर्षी साडेचार कोटी उत्पन्न मिळत असले, तरी खर्च त्यापेक्षा अधिक पटीने होत आहे. सुमारे साडेतीन कोटींचे वीजबिल आणि जॅकवेलमधील पंप दुरुस्तीवरच अधिक खर्च होऊ लागला. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून २००४ मध्ये कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटी योजना राबवण्याचा प्रस्ताव मांडला. तत्कालीन पाटबंधारेमंत्री सुनील तटकरे यांनी कोळकेवाडी धरणातून पाणी उचलण्यास मान्यता दिली. तसा कायदेशीर करारदेखील चिपळूण नगरपालिका व पाटबंधारे विभागात झाला. त्यानंतर योजनेसाठी सर्व्हे करून त्याचा अहवाल संबंधिताकडे पाठवण्यात आला. आमदार शेखर निकम यांनी प्रयत्न केल्यानंतर या योजनेच्या १६० कोटींच्या आराखड्याला तांत्रिक मंजुरी मिळाली. कोळकेवाडी धरणाच्या आऊटलेटपासून खेंड येथील नवीन साठवण टाकीपर्यंत पाईपलाईन टाकण्यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचा सल्ला घेतला जात आहे.


जुन्या साठवण टाक्यांचा वापर
खेंड येथील डोंगरमाथ्यावरील १०० गुंठे नियोजित जागेत ११.५ लाख लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी खेंड येथे ७.५ लाख लिटर क्षमतेच्या साठवण टाकीसोबत ११.५ लाख लिटरची नवीन साठवण टाकी उभारली जाणार आहे. डीबीजे महाविद्यालय येथे ५.५६ लाख लिटर, गोवळकोट येथे ३.७५ लाख लिटर, पाग येथील ४ लाख लिटर, गुहागर बायपास येथील ८ लाख लिटर व गोवळकोट येथील ७ लाख लिटरच्या जुन्या साठवण टाक्यांचा वापर केला जाणार आहे.

असे मिळणार पाणी
कोळकेवाडीत १११.५० मीटर उंचीवरून पाणी उचलणार
तेथून १६ किलोमीटर पाईपलाईनद्वारे पुढेपर्यंत आणणार
खेंड येथे १०६ मीटर उंचीवर पाणी टाकीत साठवणार
७६ मीटर उंचीपर्यंत ४ टाक्यांत ग्रॅव्हिटीने पुरवठा
डीबीजे, पाग, गुहागर बायपास, गोवळकोट येथे टाक्या
या टाक्यांमधून शहरातील सहा विभागांना मुबलक पाणी
शहराच्या प्रत्येक भागात सहा मजल्यावरही पोचणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

पाणी मागणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेला ‘मुले चोरणारी’ समजून मारहाण, नागपूरमधील धक्कादायक प्रकार...

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Latest Marathi Live Update: सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT