मुलीशी गैरवर्तन
करणाऱ्याला अटक
रत्नागिरी ः रस्त्याने चालणाऱ्या अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या संशयित तरुणास ग्रामीण पोलिसांनी अटक केली. ही घटना काल (ता. १०) रात्री घडली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. विकास विजय माने असे संशयित तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी काल रस्त्याने चालत जात होती. तेव्हा संशयिताने तिच्याशी गैरवर्तन केले. तिने आरडाओरडा केला. त्यानंतर संशयिताने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्या संशयित तरुणास अटक केली. पिडीतेच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
---
बालीकेशी गैरवर्तन
करणाऱ्याला अटक
रत्नागिरी ः तालुक्यातील एका आठ वर्षीय मुलीशी वृद्धाने गैरवर्तन केले. पोलिस ठाण्यात संशयित वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत पेडांमकर (वय ६५) असे संशयित वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ८) डिसेंबरला सकाळी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संशयित वृद्ध हा अल्पवयीन मुलीला चिरफळे जमा करण्यासाठी घेऊन गेला होता. त्या वेळी त्याने तिच्याशी गैरवर्तन केले. या घटनेला घाबरून गेलेल्या मुलीने ही हकीगत आपल्या पालकांना सांगितली. मुलीच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपासात त्याला अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.