कोकण

गीता पठण, वाचनासह आचरणही महत्त्वाचे

CD

31003


गीता पठण, वाचनासह आचरणही महत्त्वाचे
प्रभुदास आजगावकरः मालवणात जयंती सोहळा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ११ : गीता ही जीवनातील सर्व समस्यांचे समाधान आहे. जे उपाय गुगलमध्येही सापडणार नाहीत ते आपल्याला गीतेमध्ये सापडतील. गीतेचे वाचन, पठण याचसोबत तिचे आचरण करणे हे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सत्संग आयामाचे प्रमुख, कीर्तनकार शिक्षक प्रभुदास आजगावकर यांनी केले.
शहरात विश्व हिंदू परिषद मालवण प्रखंडच्यावतीने गीता जयंतीनिमित्त कन्याशाळा प्रशालेच्या पहिली ते सातवीच्या १५० विद्यार्थ्यांचा सामूहिक गीता वाचन कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्रीधर काळे, सत्संग आयामाचे प्रमुख प्रभुदास आजगावकर, विश्व हिंदू परिषद प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत आदी उपस्थित होते. कन्याशाळेच्या (कै.) गंगूबाई कृष्णराव देसाई सभागृह येथे हा उपक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभू श्रीकृष्णाच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक भाऊ सामंत यांनी स्वागत केले. त्यांनी विहिंपच्या उपक्रमांचा व उद्देशांचा आढावा घेतला. आजगावकर यांनी प्रास्ताविकात परिषदेच्या सत्संग आयामा अंतर्गत गीता वाचन कार्यक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर काळे यांनी गीतेची महती सांगितली. मानवाचे संपूर्ण जीवन सुखकर होण्यासाठी गीतेचे नियमित वाचन, पठण व आचरण याचा त्यांनी विद्यार्थ्यांना आग्रह केला.
भूषण साटम यांनी पसायदान सादर केले. या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते श्रीधर काळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तालुका कार्यवाह रत्नाकर कोळंबकर, उद्योजक भूषण साटम, सनातन संस्था मालवणचे अरविंद मयेकर, विहिंपचे कार्यकर्ते जयराम उर्फ बबन परुळेकर, कन्या शाळा प्रशालेच्या शिक्षिका करलकर, गोसावी, चव्हाण, गार्गी कुशे उपस्थित होते. भाऊ सामंत यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

बाबो...! 'हा' अभिनेता चक्क विकतोय सिलेंडर, १० लाख रुपयांना एक सिलेंडर आणि...

Latest Marathi News Live Update : धुळ्यात गॅस टंचाईमुळे लाकडांची विक्री वाढली

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Crime: 'अहो ऐका ना, भजी आणता का'? खाण्याच्या बहाण्याने पतीला बसमधून उतरवले, नंतर पत्नीने प्रियकरासोबत नको ते केले

SCROLL FOR NEXT