कोकण

''ते'' कंत्राटी विज कामगार राणे बंधूंमुळे पुन्हा सेवेत

CD

swt1123.jpg
31005
कुडाळः कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांच्यासमवेत वीज कंत्राटी कामगार. (छायाचित्र ः अजय सावंत)

''ते'' कंत्राटी विज कामगार
राणे बंधूंमुळे पुन्हा सेवेत
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः जिल्ह्यातील ५१ कंत्राटी वीज कामगारांना आयटीआय इलेक्ट्रिकल, वायरमन डिग्री नसल्याने
महावितरण कंपनीने सेवेतून कमी केले होते. आमदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले.
जिल्ह्यात महावितरणकडे सुमारे ५५० कंत्राटी वीज कर्मचारी आहेत. अलीकडे महावितरणने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आयटीआय इलेक्ट्रिकल, वायरमनची डिग्री सक्तीची केली आहे. त्यामुळे महावितरणकडे कार्यरत असलेल्या सुमारे ३०० कामगारांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे या कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती. कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी राणे बंधूंचे लक्ष वेधले होते. आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनंतर कुडाळ विभागातील एकाही कर्मचाऱ्याला कमी करण्यात आलेले नाही तर कणकवली विभागातील ५१ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचे समजताच आमदार नितेश राणे यांनी ठेकेदार आणि महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा केल्यानंतर या कामगारांना तात्काळ कामावर पुन्हा हजर करून घेण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे ३०० कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील बेकारीची कुऱ्हाड टळली आहे. या कामगारांनी कुडाळ एमआयडीसी विश्रामगृहात एकत्र येऊन आमदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेचे आभार मानले. यावेळी वीज कंत्राटी कामगार संघ जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर, समाधान चव्हाण, योगराज यादव, ऋषिकेश पवार, गणेश देसाई, जितेंद्र परब, प्रकाश धुरी, संदेश गावडे, धनंजय देसाई, मंदार गोसावी, रघुनाथ जाधव, गुरुनाथ कुडव यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

कोट
जिल्ह्यात माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांची संघटना गेली १४ वर्षे कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळवून देऊ.
- अशोक सावंत, नेते, कंत्राटी कामगार संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

SCROLL FOR NEXT