कोकण

मालवणात पालिकेच्यावतीने प्लास्टिकविरोधात धडक मोहीम

CD

swt1125.jpg
31007
मालवणः शहरात पालिकेने जप्त केलेला प्लास्टिक साठा.

मालवणात पालिकेच्यावतीने
प्लास्टिकविरोधात धडक मोहीम
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ११ः येथील पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली चार फिरत्या पथकांद्वारे बाजारपेठेतील स्थानिक व्यापारी, फळविक्रेते, फुलविक्रेते, मच्छी विक्रेते, किराणा दुकाने, बेकरी, पानपट्टी स्टॉल अशांवर प्लॅस्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या अंदाजे दीडशे किलो एवढ्या वजनाच्या प्लॅस्टिक पिशव्या जप्त करुन २१ हजार ९०० रुपये एवढ्या रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली. श्री. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाचे संजय पवार, मंदार केळुसकर तसेच कर्मचारी पथकाने ही कारवाई केली.
केंद्रीय पर्यावरण, वने व‌ हवामान बदल मंत्रालयाने १ जुलै २०२२ पासून ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या सिंगल युज प्लॅस्टिक पिशवी उत्पादन, आयात, साठवण, विक्री व वापरावर बंदी केली आहे. महाराष्ट्र प्लास्टिक आणि थरमोकॉल अधिसूचना २०१८ नुसार दोषी आढळल्यास दोषी आढळल्यास ५०० रुपये जागेवर दंड व संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपये दंड आकारण्याची तरतुद करण्यात आली आहे. शहरातील सर्व व्यापारी, व्यवसायिक व नागरिकांनी या आदेशाचे पालन करून सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णतः बंद करावा.
प्लास्टिक पिशव्यांच्या वापरा ऐवजी पर्याय म्हणून कापडी, कागदी किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या पिशव्यांचा वापर करावा. अशा प्रकारची जनजागृती स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आणि सोशल मीडिया द्वारे मालवण पालिकेमार्फत नियमित करण्यात येते. शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांनी ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांची माहिती पालिका प्रशासनास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन श्री. जिरगे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT