कोकण

पान एक-दारु पार्टीतील वादातून ''त्या'' तरुणाचा खून

CD

टीपः swt1132.jpg मध्ये फोटो आहे.
31036
मृत संतोष गुळेकर
टीपः swt1133.jpg मध्ये फोटो आहे.
31037
मुख्य संशयित चेतन परब

टीपः swt1134.jpg मध्ये फोटो आहे.
31038
भालावल ः येथे याच घरात संशयितांनी दारू पार्टी केली.

टीपः swt1135.jpg मध्ये फोटो आहे.
31039
भालावल ः घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिस व न्यायवैद्यकचे अधिकारी.

दारू पार्टीतील वादातून
''त्या'' तरुणाचा खून

मुख्य संशयित अटकेत; आणखी सहाजणांची चौकशी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ११ ः भालावल फौजदारवाडी येथील संतोष नारायण गुळेकर यांचा रविवारी (ता. ८) दारू पार्टीत झालेल्या वादातून खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी येथील पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तेथीलच मुख्य संशयित चेतन रवींद्र परब (वय ३५) याला आज सायंकाळी उशिरा अटक केली.
दरम्यान, या दारू पार्टीत सहभागी असलेल्या अन्य सहा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, चौकशीनंतर संशयितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले व उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत जलदगतीने तपास करण्याच्या सूचना बांदा पोलिसांना दिल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष यांचा मंगळवारी (ता. १०) सायंकाळी त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूकडील पडवीत पायऱ्यांवर मृतदेह आढळला होता. त्यांच्या डोक्यावर पाठीमागील बाजूस वार केल्याची जखम असल्याने हा घातपात असल्याची शक्यता व्यक्त होत होती. तो घरात एकटाच राहत असल्याने सुरुवातीला ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही. ती समजल्यानंतर भाऊ पंढरीनाथ गुळेकर यांनी संतोष यांच्या घरी धाव घेतली. बांदा पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलिस निरीक्षक विकास बडवे, उपनिरीक्षक सुनील पडवळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डी. एम. पवार, हवालदार राजेश गवस यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. उशीर झाल्याने मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले नव्हते. त्यानंतर मृताचा भाऊ पंढरीनाथ यांच्या फिर्यादीनुसार येथील पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
दरम्यान, आज सकाळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी मृतदेहाचे विच्छेदन केले. यामध्ये मृताच्या डोक्यावर डाव्या बाजूला खोलवर गंभीर वार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संतोष याचा खूनच झाल्याची पुष्टी मिळाली. त्यानंतर बांदा पोलिसांनी तपासाची चक्रे जोरदार फिरविली. विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर बांदा पोलिसांचे पथक तत्काळ भालावल येथे दाखल झाले. त्यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक समीर भोसले, न्यायवैदकचे निरीक्षक प्रशांत मांगडे, उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, उपनिरीक्षक सुनील पडवळ, राजेश गवस, बाळकृष्ण गवस, प्रसाद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी मुख्य संशयित चेतन परब याला घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले. त्याने आपणच मृताला दारूच्या नशेत प्लास्टिक खुर्चीच्या साहाय्याने मारहाण केल्याची प्राथमिक कबुली पोलिसांना दिली. यावेळी अन्य सहाजण पार्टीत सहभागी झाल्याचेही त्याने सांगितले व त्यांची नावेही चौकशीत उघड केली. बांदा पोलिसांनी या सहाहीजणांना विविध ठिकाणांवरून ताब्यात घेतले. सुरुवातीला ते संदिग्ध माहिती देत होते. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी पार्टीत घडलेली सविस्तर माहिती दिली. त्यांच्याकडून माहिती घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे या प्रकरणात आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्य संशयित चेतन याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. ८) भालावल येथे चेतन याच्या निवासस्थानी पार्टीचे आयोजन केले होते. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण एकत्र आले होते. यावेळी चेतन व मृत संतोष यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. चेतन याने संतोषला प्लास्टिक खुर्चीच्या साहाय्याने मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यावर खुर्चीचा जोरदार प्रहार केला. यामुळे तो विव्हळला व जीव वाचविण्यासाठी पळून जात असताना चेतन याच्या घराच्या मागील पडवीत जाऊन कोसळला. यानंतर सर्वांनी तेथून पोबारा केला. त्यानंतर संतोष हा मंगळवारी (ता. १०) आपल्या घरात मृतावस्थेत आढळला. संशयिताला उद्या (ता.१२) सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विकास बडवे करत आहेत.
दरम्यान, मृत संतोष यांचा पुतण्या नितीन महेश गुळेकर यांनी बांदा पोलिसात फिर्याद दिली आहे. आज दिवसभर घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे तसेच न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक यांनी ठाण मांडून माहिती गोळा केली. मृताचे घर व ज्याठिकाणी पार्टी झाली ते ठिकाण पोलिसांनी सील करत त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
---------------
चौकट
गूढ उकलण्याचे आव्हान
मृत संतोष हा संशयित चेतनच्या घरी कोसळला, तर त्याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी कसा सापडला? हे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. त्याच्या मृत्यूस अन्य कोणी कारणीभूत आहेत का? याचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT