कोकण

करणी प्रकरण

CD

31035
तृप्ती मुळीक

करणीतून लुबाडणूकप्रकरणी
ओरोसच्या महिला पोलिसास अटक

कोल्हापूर पोलिसांची कारवाई; ८४ लाखांना लुटले

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः करणी काढण्याच्या नावाखाली कोल्हापूर येथील कुटुंबाकडून ८४ लाखांचा ऐवज लुबाडणाऱ्या टोळीतील संशयित महिला पोलिस तृप्ती संजय मुळीक (वय ३५, रा. सिद्धिविनायक पार्क, ओरस, सिंधुदुर्ग) हिला अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून गायब असलेल्या तृप्तीच्या मागावर असलेल्या कोल्हापूर पोलिसांनी तिच्या घरी जाऊन ताब्यात घेतले.
फेब्रुवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत विविध विधी करण्याच्या नावाखाली फिर्यादी सुभाष हरी कुलकर्णी (वय ७७, रा. गंगावेश-कोल्हापूर) यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी मुख्य संशयित दादा पाटील महाराजसह नऊ जणांविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. फिर्यादी सुभाष कुलकर्णी यांच्या घरावर करणी करण्यात आल्याचे भासवून ती काढण्यासाठी दादा पाटील महाराज, नित्यानंद नायक यांनी विविध विधी, पूजा करण्यास भाग पाडले होते. संशयित साथीदार सोनाली पाटील ऊर्फ धनश्री काळभोर, कुंडलिक झगडे, गोळे, तृप्ती मुळीक हिच्यासह नऊ जणांनी अनेकवेळा गंगावेश येथील कुलकर्णींच्या घरी येऊन घरातील दागिने, भांडी, कपडे, लाकडी सामानावर काळी जादू झाल्याची भीती दाखवून त्याचे शुद्धीकरण करण्याच्या नावाखाली सर्वकाही लुटून नेले. संशयित महिला पोलिस तृप्ती मुळीक हिच्या घरी नेऊनही कुलकर्णी यांना या विधींची माहिती देण्यात आली होती. मुळीक सध्या सिंधुदुर्ग पोलिसांत कार्यरत होती. गुन्हा दाखल झाल्यापासून गायब झालेल्या तृप्तीच्या मागावर असलेल्या जुना राजवाडा-कोल्हापूर पोलिसांनी तिच्या घरी जाऊन ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Retirement: भारताला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी कर्णधाराची निवृतीची घोषणा; म्हणाला, बाबर आझमसारखा...'

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thane News: ठाण्यातील तलावांचा कायापालट होणार, नागरिकांना बोटिंग, मासेमारीचा आनंद घेता येणार; महापालिकेचा नवा प्लॅन

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

SCROLL FOR NEXT