31205
देवगड रोटरी क्लबतर्फे
विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १३ः तालुक्यातील विविध शाळांमध्ये ‘घडताना बिघडताना‘ या एकपात्री कार्यक्रमाचे आयोजन येथील रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीच्यावतीने केले होते. कार्यक्रमाच्या संकल्पनेसह सादरकर्ते संजय गोविलकर (पेण-रायगड) होते. यावेळी रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते. आपले भविष्य उज्वल व्हावे यासाठी मुले धडपडत असतात आणि पालकही त्यासाठी अथक प्रयत्न करीत असतात. अशा सर्वांसाठी यशाचा नेमका मंत्र सांगणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन येथील शेठ म. ग. हायस्कूल, वाडा (ता.देवगड) येथील अ. कृ. केळकर हायस्कूल, जामसंडे येथील श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिर तसेच येथील स. ह. केळकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी केले होते. सुमारे एक हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यानी कार्यक्रमाचा लाभ घेतल्याची माहिती रोटरीच्यावतीने देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रोटरी क्लबच्या अध्यक्षा मनस्वी घारे, खजिनदार अनुश्री पारकर, श्रीपाद पारकर, विजय बांदिवडेकर, मनीषा डामरी आणि अनिल गांधी आदींनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.