rat१२p३८.jpg -
P२४N३११८९
राजापूर ः आमदार किरण सामंत यांना निवेदन देताना साजिया काझी गिरकर. या प्रसंगी हनिफ काझी, सौरभ खडपे.
राजापूर शहरात बिबट्याचा मुक्त संचार
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ; बंदोबस्तासाठीच्या वनविभागाला सूचना
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ ः गेल्या काही दिवसांपासून राजापूर शहर परिसरासह बाजारपेठेत बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्री भर लोकवस्तीत बिनधास्त फिरणाऱ्या बिबट्याला नागरिकांसह वाहनचालकांनीही पाहिला आहे. त्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी राजापूर शहरवासियांतर्फे माजी नगराध्यक्ष हनिफ काझी यांनी आमदार किरण सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार सामंत यांनीही राजापूर वनपाल जयराम बावदाने यांना यावर योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा राजापूर शहर परिसरात मुक्तपणे संचार सुरू आहे. शहरातील भटाळी, पंचायत समिती परिसर, बाजारपेठ या भागामध्ये बिबट्या बिनधास्तपणे फिरताना लोकांना दिसला. दोन दिवसांपूर्वी रात्री ११.३० वाजल्यानंतर बाजारपेठेत बिबट्याचे काही लोकांना दर्शन झाले. त्यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वनविभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. आज राजापुरात आलेले आमदार सामंत यांची माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, शिवसेना शहरप्रमुख सौरभ खडपे, महिला आघाडीच्या साजिया काझी गिरकर, ज्येष्ठ पत्रकार महेश शिवलकर यांनी भेट घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबतचे लेखी निवेदन दिले. त्याची तत्काळ दखल घेत बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबत वनविभागाने योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार सामंत यांनी राजापूरचे वनपाल बावदाने यांना दिल्या.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.