kan131.jpg
31302
फोंडाघाटः येथील तालुकास्तरिय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्याना पारितोषिक देवून सन्मानित करताना महेश सावंत शेजारी संजय आग्रे, अरूण चव्हाण आदी.
------
विज्ञान प्रदर्शनाकडे संधी म्हणून विद्यार्थ्यांनी पहावे
संजना आग्रेः फोंडाघाट येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
फोंडाघाट,ता. १३ः विज्ञान प्रदर्शन ही विद्यार्थ्यांना भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थी आणि शाळेला मिळालेली एक संधी आहे. यामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. मात्र, विज्ञान प्रदर्शनाकडे संधी म्हणून विद्यार्थ्यांनी पहावे, असे प्रतिपादन फोंडाघाट सरपंच संजना आग्रे यांनी केले.
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सरपंच संजना आग्रे यांचे हस्ते झाले. यावेळी संस्थेचे चेअरमन महेश पटेल, संचालक संजय आग्रे, रंजन नेरुरकर, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, मुख्याध्यापक श्री. रासम आणि शैक्षणिक अधिकारी उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील बहुतेक सर्व शाळांनी सहभाग घेतला होता. या विज्ञान प्रदर्शनातील विजेते असे ः प्रतिकृती माध्यमिक विभाग अनुक्रमे असे - उमरसकर दिव्या (विद्यामंदिर कणकवली), जागृती वेंगुर्लेकर (न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट), सुश्रुत नाणल (आयडियल इंग्लिश स्कूल) तर शिक्षक प्रतिकृती प्राथमिक विभाग - सिताराम पारधी (जि.प. केंद्र शाळा साळीस्ते), भक्ती जाधव (प्राथमिक शाळा शिडवणे), जितेंद्र पेडणेकर (परिषद पूर्ण शाळा तोंडवली). शिक्षक प्रतिकृती माध्यमिक विभाग - नूतन भावे (महाडिक माध्यमिक विद्यालय तरळे), विजयकुमार राठोड ( न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट). प्रयोगशाळा सहाय्यक परिचर विभाग - अनिल चव्हाण (विद्यामंदिर घोणसरी), सहदेव जाधव (नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करुळ).
निबंध स्पर्धा प्राथमिक विभाग अनुक्रमे -वैष्णवी सुतार (विद्यामंदिर घोणसरी),अक्षता मेस्त्री ( माध्यमिक शाळा कनेडी), संकल्प चिंदरकर (प्राथमिक शाळा कलमठ कुंभारवाडी). निबंध स्पर्धा माध्यमिक विभाग- स्नेहल रेडकर (कणकवली कॉलेज), पूर्वा सावंत ( एस. एम. हायस्कूल), आर्या रासम (इंग्लिश स्कूल फोंडाघाट). वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक विभाग - हर्षिका बोबकर(इंग्लिश स्कूल फोंडाघाट), सलोनी शेलार ( पूर्ण प्रा.शाळा नांदगाव मधली वाडी), जागृती कदम (ल. गो.सामंत विद्यालय), कर्तृत्वा हरकुळकर (विद्यामंदिर कणकवली). वक्तृत्व स्पर्धा माध्यमिक विभाग - अस्मित मुळीक ( कळसुली इंग्लिश स्कूल), शुभम तेली (कळसुली इंग्लिश स्कूल), गौरेश तायशेटे (आयडियल इंग्लिश), आयुष बागवे (आयडियल इंग्लिश स्कूल), आदित्य कोरगावकर (माध्यमिक विद्यालय शिवडाव),अनिरुद्ध केनी (माध्यमिक विद्यालय शिवडाव). प्रश्नमंजुषा स्पर्धा माध्यमिक विभाग - पुर्वी प्रभुदेसाई (कणकवली कॉलेज), सुकन्या राणे (कणकवली कॉलेज), मयविश मुल्ला (जूनियर कॉलेज खारेपाटण), पल्लवी माने (खारेपाटण), ध्रुव तेंडूलकर (विद्यामंदिर कणकवली), सानवी कारेकर (विद्यामंदिर कणकवली)
दिव्यांग विद्यार्थी प्राथमिक विभाग - रूद्र भोवड (इंग्लिश स्कूल, फोंडाघाट), बाबू भिमत (माध्यमिक विद्यालय, शेर्पे). दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृती माध्यमिक विभाग - दिवेश रावराणे (इंग्लिश स्कूल फोंडाघाट) यांनी यश पटकावले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.