rat१३p८.jpg -
OP२४N३१३१६
चिपळूण ः खरवतेतील विद्यार्थांची शास्त्रीय पद्धतीने केलेली शेवंतीची आधुनिक फुलशेती.
खरवते-दहिवलीत शेवंती फुलांची लागवड
शरदचंद्रजी पवार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रयोग; फुलशेतीला पोषक वातावरण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ : चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय, खरवते-दहिवली येथील चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमांतर्गत शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून शेवंती फुलांची लागवड करण्यात आली आहे.
कोकणात व्यावसायिक दृष्टिकोन लक्षात घेऊन फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूप कमी आहे; परंतु कोकणातील वातावरण हे यासारख्या फुलशेतीला पोषक आहे. स्थानिक शेतकऱ्यांमध्ये फुलशेतीचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशातून विद्यार्थ्यांकडून हा प्रयोग केला आहे. या प्रयोगासाठी शेवंतीच्या श्वेता व समृद्धी व्हाईट या जातींची निवड करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या संशोधनात्मक प्रकल्पासाठी ''कॅडॉक्स हडसन इफेक्ट'' ही संकल्पना राबवण्यात आली आहे. यामध्ये सुमारे ४६ एलईडी बल्बचा वापर करण्यात आला आहे. या अभिनव तंत्रज्ञानामुळे फुलांची संख्या, आकार, वजन व आयुष्यमान वाढीस मदत होते व रोपांमधील प्रकाश संश्लेषण क्रिया उत्तमरित्या चालू राहते.
सह्याद्री शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनीतकुमार पाटील यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठीचा हा संशोधनात्मक प्रकल्प राबवण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रकल्प अधिकारी प्रा. स्मिता जाधव व डॉ. ओंकार निर्मळ यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले आहे. या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना कोकणात फुलशेती करण्यास एक प्रकारे बळ मिळाले आहे.
---
अशी केली लागवड
विद्यार्थ्यांकडून या सर्व रोपांना रात्री ७ ते ८ तास कृत्रिम प्रकाशाचा पुरवठा केला जातो जेणेकरून फुलांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. ही संपूर्ण फुलशेती मल्चिंगच्या गादी वाफ्यांवर साकारण्यात आली आहे. ४५ बाय ४५ सेमी अंतरावर सुमारे १२०० रोपांची लागवड विद्यार्थ्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.