31357
भ्रष्ट्राचार मुक्तीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा
अॅड. राहुल गायकवाड ः सावंतवाडीत महाविद्यालयात सतर्कता जागरूकता सप्ताह
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १३ ः देश भ्रष्टाचार मुक्त बनवण्यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे. पुढे येणाऱ्या पिढीला लाचखोरी संदर्भातील कायद्यातील शिक्षेच्या तरतुदी व भ्रष्ट्राचार मुक्तीच्या विषयाबद्दल युवकांनी पुढाकार घेऊन जागरूक केले पाहिजे, असे प्रतिपादन अॅड. राहुल गायकवाड यांनी कायदेविषयक बाबींवर मार्गदर्शन करताना श्री पंचम खेमराज महाविद्यालय केले.
कोकण कला व शिक्षण विकास संस्था, नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग यांच्यावतीने सावंतवाडीतील श्री पंचम खेमराज महाविद्यालय येथे सतर्कता जागरूकता सप्ताह २०२४ अंतर्गत ‘सत्यनिष्ठा कि संस्कृती से राष्ट्र कि प्रगती’ उपक्रमाची माहिती महाविद्यालयीन मुलांना देण्यात आली. श्री. गायकवाड यांनी लाचखोरी संदर्भातील कायद्यातील शिक्षेच्या तरतुदी व भ्रष्ट्राचार मुक्तीच्या विषयाबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच सत्यनिष्ठा कि संस्कृती बाबत उदाहरणासहित माहिती दिली.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य ठाकूर म्हणाले, ‘‘भ्रष्टाचार हा एक किड्यासारखा आहे जो देश, अर्थव्यवस्था आणि एकूणच नैतिक मूल्ये निकामी करतो. प्रगत आणि मूल्याधारित समाजाच्या विकासात हा मोठा अडथळा आहे. जगातील जवळपास प्रत्येक देश या समस्येने त्रस्त आहे आणि यासाठी आपण सर्वानी शपथ घेतली पाहिजे आणि स्वतःपासून याची सुरुवात केली पाहिजे. आपण लाच देणार नाही आणि लाच घेणार नाही या नियमावर ठाम राहायला हवे.’’
या प्रसंगी ‘सत्यनिष्ठा कि संस्कृती से राष्ट्र की प्रगती’ या विषयी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याला युवकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी ६१ विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. भगवान चव्हाण यांनी संस्थेच्या उपक्रमाविषयी माहिती दिली आणि उपस्थितांचे आभार मानले, याप्रसंगी विभाग प्रमुख सचिन देशमुख, संस्था समन्वयक भावना साटम आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.