31358
खांबाळे केंद्रशाळेचा स्टॉल ठरला लक्षवेधी
जत्रोत्सवात उपक्रमः विविध दर्जेदार वस्तूंची केली वस्तू
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १३ः खांबाळे येथील श्री. देवी आदिष्टी जत्रोत्सवात केंद्रशाळेतील विद्यार्थ्याचा स्टॉल लक्षवेधी ठरला. मुलांचे व्यवहार ज्ञान वाढावे याकरीता हा उपक्रम राबविण्यात आला होता.
खांबाळे येथील श्री. देवी आदिष्टीचा जत्रोत्सव ११ डिसेंबरला झाला. या जत्रोत्सवाला हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली. जत्रोत्सवाच्या निमित्ताने शेकडो स्टॉल मंदिर परिसरात उभे करण्यात आले होते. परंतु, यामध्ये केंद्रशाळा खांबाळेचा स्टॉल मात्र लक्षवेधी ठरला. या शाळेच्या व्यवस्थापन समितीने शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण घेत असतानाच चौफेर ज्ञान मिळावे, यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. त्यातूनच जत्रोत्सवात स्टॉलचा उपक्रम राबविण्यात आला. विविध प्रकारची दर्जेदार लोणचे, आवळा सरबत, कोकम सरबत, सांडगी मिरची अशी दर्जेदार उत्पादने विक्रीकरिता ठेवली होती. ग्राहकांनी देखील या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थीच वस्तूंची देवाणघेवाण करीत होते. या स्टॉलला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलीस उपनिरीक्षक किरण घाग, पोलीस उपनिरीक्षक झेड. ए. फर्नाडीस यांनी भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांकडून खरेदी देखील केली. यावेळी मुख्याध्यापिका जयश्री शेटे, यशवंत कांबळे, हनुमंत सुतार, धनश्री पवार आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.