-rat१३p१७.jpg-
P२४N३१३५१
रत्नागिरी : एनसीपीए, खल्वायन संस्थेतर्फे शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती देताना डावीकडून मनोहर जोशी, प्रदीप तेंडुलकर आणि श्रीनिवास जोशी.
-------
जानेवारीत संगीत नाट्य महोत्सवाची पर्वणी
एनसीपीए, खल्वायनतर्फे आयोजन; ताजमहाल, अमृतवेल, मत्स्यगंधाचे प्रयोग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट सेंटर (एनसीपीए) आणि येथील खल्वायन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन ३ ते ५ जानेवारीदरम्यान केले आहे. स्वा. सावरकर नाट्यगृहात ३ जानेवारीला संगीत ताजमहल, ४ ला संगीत अमृतवेल आणि ५ ला संगीत मत्स्यगंधा नाटक रंगणार आहे. या संदर्भात आज खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी, कार्यवाह प्रदीप तेंडुलकर व खजिनदार श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. एनसीपीए ही भारतातील प्रमुख सांस्कृतिक संस्था आहे. खल्वायन संस्था ऑक्टोबर १९९७ पासून शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीताची व संगीत नाटकांची वैभवशाली परंपरा जपण्यासाठी कार्यरत आहे. आता या दोन्ही संस्थांनी संयुक्त विद्यमाने संगीत महोत्सवाचे आयोजन केले आहे.
महोत्सवाचे उद्घाटन ३ जानेवारीला सायंकाळी ७ वा. मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या दिवशी ५९व्या राज्य नाट्य महोत्सवात १० वैयक्तीक पारितोषिकांसहित प्रथम क्रमांक मिळवलेले संगीत ताजमहल नाटक होईल. हार्मोनियम वादक व संगीतकार डॉ. विद्याधर ओक यांनी हे नाटक लिहिले व संगीतही दिले. ४ ला सायंकाळी ७ वाजता कादंबरीकार, नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित आणि ६२व्या राज्य नाट्य महोत्सवात ८ वैयक्तीक पारितोषिकांसहित तृतीय क्रमांक मिळवलेल्या संगीत अमृतवेल नाटक होणार आहे. सातशे वर्षापूर्वीपासून सामाजिक विषमतेच्या गर्तेत सापडलेल्या समाजाला सन्मार्गावर आणण्यासाठी संतांनी आपले आयुष्य वेचले त्या महान विभूतींमध्ये संत चोखामेळा यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागते. त्यांच्या जीवनाचा अभ्यास करताना त्यांनी लिहिलेले अभंग, त्यांनी सोसलेल्या यातना आणि विठ्ठलावरची अतूट निष्ठा यातून त्यांची सामाजिक एकतेसंदर्भातील अमृतवेलीसारखे योगदान, त्यांचे नाट्यमय जीवनचरित्र या नाटकातून मांडले आहे. फिरते नेपथ्य, बहारदार गायकी असलेल्या नव्या चालीच्या सुमधूर नाट्यपदांनी हे नाटक नटलेले आहे.
----
संगीत मत्स्यगंधेने सांगता
महोत्सवाची सांगता ५ जानेवारीला सायंकाळी (कै.) प्रा. वसंत कानेटकर यांचे संगीत मत्स्यगंधा नाटकाने होईल. महाभारतातील कथाभागातील एक पान सत्यवती आणि भीष्म यांच्यातील संघर्ष यात आहे. तीनही संगीत नाटकांचे दिग्दर्शन मनोहर जोशी यांनी केले असून, रत्नागिरी, चिपळूण, देवगड, मुंबई, बीड, पुणे येथील प्रसिद्ध कलावंतांबरोबरच सावनी पाटेकर, सावनी शेवडे, श्रेयस व्यास, लक्ष्मीप्रसाद पटवारी हे प्रसिद्ध तरुण कलाकार भूमिका साकारणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.