कोकण

शिक्षण विभागाकडून अनागोंदी कारभार

CD

शिक्षण विभागाकडून अनागोंदी कारभार
राजन कोरगावकर ः अर्धा महिना संपला तरी शिक्षक वेतनाविना
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १३ ः जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार सुरु असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. त्यामुळेच शिक्षकांचे पगार १२ तारीख उलटून गेली तरी सुद्धा झाले नाहीत. चालढकल करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईसाठी वरिष्ठांकडे मागणी करणार असल्याचे महाराट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
किमान पंचवीस तारखेच्या आधी बीडीएस आल्यास एक तारखेला पगार होऊ शकतो. २७ तारखेला बीडीएस येऊन सुद्धा १२ तारखेपर्यंत पगार न देणे म्हणजेच चालढकलच आहे, असा आमचा आरोप आहे. वेळेवर बिल सादर केली जात नाहीत. केली तर ती अर्धवट सादर केली जातात. काही तालुके वेळेवर सादर करतात. काही तालुके उशिरा सादर करतात. उशिरा सादर करणाऱ्या तालुका अधिकाऱ्यांवर शिक्षणाधिकाऱ्यांचा वचक असणार की नाही. सगळीच मनमानी चाललेली आहे. ना प्रमोशन ,ना वेळेवर पगार, ना कुठल्या प्रश्नांची सोडवणूक, हे असे किती दिवस चालणार? वरिष्ठ अधिकारी सुद्धा याकडे दुर्लक्ष करून असतात. शाळांना मिळणारे अनुदान दोन दिवसात पीएफएमएस करायला सांगून खर्ची घालायला सांगतात. ते शक्य नसल्याने रकमा मागे जातात. २०१२ पासून कोणत्याही प्रकारच्या पदोन्नतीच्या संधी नाही. सर्व जिल्ह्यात पदवीधर, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी पदे भरली गेली. मात्र, या जिल्ह्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांची मानसिकता पदोन्नती देण्याची नाही, अशा मानसिकतेमुळे या जिल्ह्यातील अनेक शिक्षक वंचित राहिले. काही निवृत्त सुद्धा झाले. त्यामुळे त्यांच्या आर्थिक नुकसानीला हे अधिकारीच जबाबदार आहेत. सकारात्मक मानसिकता असेल तर पगार वेळेवर होतील. मात्र, चालढकल करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईसाठी वरिष्ठांकडे मागणी करणार असल्याचे श्री. कोरगांवकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

कोट
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे पगार झाल्याशिवाय अधिकाऱ्यांनी पगार घेऊ नयेत, असे ज्यावेळी होईल त्यावेळी कर्मचाऱ्यांची वेदना त्यांना समजेल. महिन्याच्या शेवटी मिळणाऱ्या पगारावर कुटुंबाची गणिते अवलंबून असतात, हे वरिष्ठांनी लक्षात घ्यावे आणि कर्मचाऱ्यांचे पगार वेळीच घालण्याची तसदी घ्यावी.
- राजन कोरगावकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप महाराष्ट्रातून राज्यसभेवर देणार महिला उमेदवार, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंच्या निकटवर्तीय; तातडीनं बोलावलं मुंबईला

रक्तातील कावीळ कशी होते? कोणत्या अवयवावर ताण येतो? 'या' 6 लक्षणांकडे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला आमंत्रण!

Latest Marathi News Live Update : माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात इराणच्या समर्थनार्थ आंदोलन

BEST Bus Accident: भांडुप बस अपघात प्रकरणी धक्कादायक खुलासा, चालकाने प्रशिक्षणच पूर्ण केलं नाही; ७०४ पानी आरोपपत्र

Iran Islamic Revolution: १९७८ चा रक्तरंजित उठाव… इराणमध्ये कशी झाली इस्लामिक राजवटीची सुरुवात, काय आहे इतिहास?

SCROLL FOR NEXT