-rat१३p१९.jpg-
P२४N३१३६८
रत्नागिरी ः कुसुम मोहिमेच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना कीर्तीकुमार पूजार.
----------------
चिरेखाणी कामगार, राखणदारांची तपासणी करा
कीर्तीकुमार पूजार ः कुष्ठरोग मुक्तीसाठी जिल्ह्यात १६ ते २० मोहीम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) या विशेष शोधमोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातील चिरेखाण कामगार, आंबाबागांमधील राखणदार व तिथे वास्तव्य करणारे शेतमजूर, परजिल्ह्यातून कामानिमित्त आलेल्या स्थलांतरित व्यक्ती, औद्योगिक वसाहतीतील कामगार, बांधकाम मजूर, आश्रमशाळा व वसतिगृहात राहणारे विद्यार्थी तसेच कारागृहातील कैदी यासारख्या सर्व जोखीमग्रस्त भागातील सर्व नागरिकांची तपासणी करावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पूजार यांनी दिल्या.
कुसुम मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या सूचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, सहाय्यक संचालक आरोग्यसेवा (कुष्ठरोग) डॉ. विवेकानंद बिराजदार, जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. सायली नाईक, लता गुंजावटे व आरोग्य विभागाचे सबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शून्य कुष्ठरुग्ण प्रसार हे ध्येय २०२७ पर्यंत साध्य करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात १६ ते २० डिसेंबर या कालावधीत कुसुमअंतर्गत आरोग्य विभागाकडून कुष्ठरुग्ण शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या कालावधीत जोखीमग्रस्त भागातील नागरिकांची आरोग्यसेवकांमार्फत तपासणी केली जाणार असल्याचे पूजार यांनी सांगितले. समाजातील नवीन कुष्ठरुग्ण शोधून त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे आवश्यक आहे. त्यासाठी या मोहिमेत सर्वांची तपासणी केली जाईल, असे सहाय्यक संचालक आरोग्यसेवा (कुष्ठरोग) डॉ. विवेकानंद बिराजदार यांनी सांगितले.
-------
लक्षणे दिसल्यास तपासणी करा
नागरिकांनी फिक्कट लालसर बधीर चट्टा, तेलकट गुळगुळीत चमकदार त्वचा, कानाच्या जाड पाळ्या, दुखऱ्या मज्जातंतू, हातापायाला मुंग्या येणे व अशक्तपणा येणे आदी लक्षणे दिसल्यास घरी येणाऱ्या स्वयंसेवकाकडून तपासणी करून घ्यावी तसेच संशयित रुग्णांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन स्वतःची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.