31372
हापूसचे महत्व, गुणवत्ता टिकवा
उमाकांत पाटीलः देवलीत शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १३ः कोकणातील हापूस आंब्याचे बाजारातील महत्व, मूल्य आणि गुणवत्ता कायम टिकून राहण्यासाठी आंबा उत्पादक शेतकरी यांनी नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे, असे आवाहन कणकवली उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील यांनी देवली येथील शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमात बोलताना केले.
सिंधुदुर्ग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व मालवण तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्यावतीने देवली येथील आंबा उत्पादक शेतकरी सुदर्शन नाईक यांच्या आंबा प्रक्षेत्रावर नुकताच शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद तालुकास्तरीय कार्यक्रम पार पडला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, मंडळ कृषी अधिकारी सिताराम परब, हसन आंबार्डेकर, कृषी पर्यवेक्षक धनंजय गावडे तसेच प्रगतशील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर, देवली ग्रामपंचायत सदस्य सचिन मालवणकर, श्यामसुंदर मेस्त्री, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सौ. लंगोटे, कृषी सेवक श्रीमती कुबल, श्रीमती भोगले, आत्मा समन्वयक निलेश गोसावी, कृषी सेवक किशोर कदम, श्री. डाखोरे तसेच मालवण पंचक्रोशीतील ७० हुन अधिक आंबा बागायतदार शेतकरी उपस्थित होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना शास्त्रज्ञ-शेतकरी सुसंवाद का महत्वाचा आहे ते अधोरेखित केले. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लाचे शास्त्रज्ञ डॉ. वैशाली झोटे यांनी आंबा पिकावरील प्रमुख कीटक व त्यांचे व्यवस्थापन याविषयी तर शास्त्रज्ञ डॉ. यशवंत गोवेकर यांनी आंबा पिकावरील प्रमुख रोग व त्यांचे व्यवस्थापन तसेच जैविक कीटकनाशके व खते यांचा वापर याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. आंबा पिकात सलग तीन वर्षे उत्तम कामगिरी करत असल्याने लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद झालेले कुंभारमाठ, मालवण येथील प्रगतशील शेतकरी फोंडेकर यांनी सुद्धा आपले अनुभव उपस्थित शेतकऱ्यांसमोर मांडले. सूत्रसंचालन पवनकुमार सौंगडे यांनी केले. आभार धनंजय गावडे यांनी मानले.
आंबा प्रक्षेत्रावर जाऊन आंबा फुलकिड नियंत्रण पथदर्शी प्रकल्प २०२४-२५ अंतर्गत निवडलेल्या आंबा बागेची उपस्थित वेंगुर्ले फळसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी निरीक्षणे घेऊन आंबा बागायतदार शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. गतवर्षी आंबा मोहोरावर फुलकिड पडल्याने आंबा बागायतदार यांच्यावर संकट ओढवले होते. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील देवलीसह अन्य गावांची फुलकिड नियंत्रण पथदर्शी प्रकल्प २०२४-२५ साठी निवड केली आहे. त्या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.