कोकण

परभणीतील घटनेचा सावंतवाडीत निषेध

CD

31380

परभणीतील घटनेचा सावंतवाडीत निषेध
प्रांताधिकाऱ्यांना निवेदनः देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ः परभणी येथे भारतीय संविधानाची समाजकंटकाकडून झालेली विटंबना आणि त्यातून आंबेडकर अनुयायांचा घडलेला उद्रेकाच्या घटनेचा आज सावंतवाडीतील आंबेडकर अनुयायांनी शांततेत एकत्र येत तीव्र निषेध केला. अशा विकृत प्रवृत्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रांत अधिकारी हेमंत निकम यांना दिलेल्या निवेदनातून त्यांनी केली.
परभणी येथील आंबेडकर पुतळ्यानजीक असलेल्या कोरीव भारतीय संविधानाची एका समाजकंटकाने विटंबना केल्याने आंबेडकरी अनुयायांनी एकत्र येत बुधवारी मोर्चा काढला होता. या मोर्चाचे रूपांतर आंदोलनात होऊन मोठी जाळपोळ झाली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यातही उमटले होते. सावंतवाडीसारख्या शांत शहरात अशा घटना घडू नये व शांतता अबाधित राहण्यासाठी आंबेडकरी अनुयायांसह भारतीय संविधान प्रेमींनी एकत्र येत या घटनेवर सविस्तर चर्चा करून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. अशा समाजकंटकाला कठोर शिक्षा करावी व अशा घटना पुन्हा पुन्हा राज्यात घडणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी, असे मागणी त्यांनी निवेदनातत केली आहे.
या निवेदनावर सुमारे १०० संविधान प्रेमींच्या सह्या असून ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकारी निकम यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी रवी जाधव, वासुदेव जाधव, मिलिंद नेमळेकर, लाडू जाधव, ॲड. सगुण जाधव, भावना कदम, मंगेश जाधव, के. व्ही. जाधव, के. जाधव, सुरेश कारविडेकर इत्यादी आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT