कोकण

आचरा न्यू इंग्लिश स्कूलतर्फे सायबर गुन्ह्यांबाबत जागृती

CD

31391

आचरा न्यू इंग्लिश स्कूलतर्फे
सायबर गुन्ह्यांबाबत जागृती
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १३ः वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत आचरा पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आचरा आठवडा बाजाराचे औचित्य साधत आचरा तिठा येथे पथनाट्यातून जनजागृती केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायबर, अंमली पदार्थ जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. आचरा येथे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना यांच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती केली जात आहे. काल (ता.१२) आचरा आठवडा बाजाराचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आचरा तिठा येथे पथनाट्यातून जनजागृती केली. यात नशामुक्ती, सायबर गुन्हेगारी, डायल ११२ बाबत जनजागृती केली गेली. संकटकाळी डायल ११२ कार्यप्रणालीचा वापर करुन पोलीस मदत मागून घेण्याचे आवाहन केले. यावेळी आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विशाल चोरगे, पोलीस कर्मचारी मिनाक्षी देसाई, मिलिंद परब, मनोज पुजारे, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक घुटूकडे, शिक्षिका भावना मुणगेकर यांसह विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT