कोकण

२२ डिसेंबरला रत्नागिरी ते पावस पदयात्रा

CD

-rat१३p१८.jpg-
OP२४N३१३६७
स्वामी स्वरूपानंद
---------
स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त
२२ला रत्नागिरी ते पावस पदयात्रा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जयंती उत्सवानिमित्त २२ डिसेंबरला पहाटे साडेचार वाजता जयस्तंभ येथून पदयात्रेला प्रारंभ होईल. पदयात्रेचे यंदाचे २२वे वर्ष आहे. स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या रत्नागिरीकर नागरिकांनी अवीट गोडीचे ॐ राम कृष्ण हरी नामस्मरण करत पहाटेच्या धुंद वातावरणात ज्ञानदेवांचा हरिपाठ गात पावसला जाण्याचा भक्तीमार्ग वर्षातून एकदातरी अनुभवावा म्हणजे नामाची गोडी काय असते ते या वारीत अनुभवता येईल, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
चालण्याने आरोग्याची चाचणी करता येते. आपला धीर, संयम किती आहे हे तपासून बघता येते. ही चालण्याची स्पर्धा नाही; पण आपले आरोग्य किती मजबूत आहे, श्‍वास किती खोलवर घेता येतो हे आजमावल्यामुळे आपल्या जगण्याला एक नवी उभारी येते. ही स्वामीनामाची मॅरेथॉन आहे, असे समजून जास्तीत जास्त भक्तांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जाताना पहिला थांबा कोहिनूर हॉटेलजवळ, दुसरी विश्रांती फणसोप शाळेबाहेर, तिसरा थांबा रनपार फाट्यावर असेल. साधारणपणे पावस येथे सकाळी ९ वाजेपर्यंत पोहोचता येईल. त्यानंतर मंदिरासमोर फेर धरून नाचणे, अभंग सांगणे नंतर शीण घालवण्यासाठी अल्पोपाहार, नंतर रत्नागिरी येथे परत असे वारीचे स्वरूप आहे. दमल्यामुळे दुपारी विश्रांती घ्यायला मोकळीक मिळेल. कारण, हा सर्व कार्यक्रम रविवारी आयोजित केला आहे. सर्वांचा पांढरा ड्रेस असावा. पुरुषांसाठी पांढरी टोपी आवश्यक आहे. आवश्यक असल्यास पाणीबाटली आणावी व सर्वांनी नेहमीच्या वापरातले साधे चालण्याचे बूट, चप्पल घालावेत. येताना आपले नाव, पत्ता व फोन नं. एका छोट्या कागदावर लिहून ते संयोजकांकडे द्यावे. पदयात्रेविषयीच्या अधिक माहितीसाठी राजन पटवर्धन किंवा अनंत आगाशे यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

पुण्याची बातच न्यारी! मृणाल ठाकूरने पुण्यात येताच केली 'ही' गोष्ट, खास मराठी पोस्ट करत म्हणाली... 'पुण्यात आलो आणि...'

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

SCROLL FOR NEXT