कोकण

विरण येथे आज दत्त जयंती

CD

अणसूर येथे
आज जत्रोत्सव
वेंगुर्ले, ता. १३ ः अणसूर खालचे येथील देव दाडोबा देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता.१४) साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळपासून केळी, नारळ ठेवणे, रात्री पालखी, त्यानंतर पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे.
--------------
रेडी तिवरेवाडीत
आज कार्यक्रम
रेडी, ता. १३ ः रेडी तिवरेवाडी येथील दत्त महाराज मंदिरात उद्या (ता.१४) दत्तजयंती उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. सकाळी ९ वा. पादुका अभिषेक,१० वाजता सत्यदत्त महापूजा, पादुका दुपारी १२.३० वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता भजनाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी मंदिर ट्रस्टने केले आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन देव दत्त मंदिर ट्रस्टने केले आहे.
---------------------
विरण येथे
आज दत्त जयंती
मालवण, ता. १३ ः दत्त मंदिर विरण बाजारपेठ येथे श्री दत्त जयंतीचा उत्सव उद्या (ता.१४) साजरा करण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजता श्रींची पूजाअर्चा, दुपारी १२ वाजता श्रींचा आरती, १ ते ३ या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी ५.३० वाजता श्री स्वामी समर्थ मृदुंगनाद, मृदुंगक्लास विरण, रात्री ९ वाजता श्री देव रवळनाथ दिंडी भजन मंडळ, आडवलीभटवाडी यांचे भजन होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तरुण विकास मंडळ, विरण बाजारपेठ यांनी केले आहे.
---------------------
अणाव-पालववाडीत
आज दत्त जयंती
पणदूर, ता. १३ ः अणाव-पालववाडी येथील स्वामी समर्थ मठ येथे उद्या (ता.१४) डिसेंबरला दत्तजयंती उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता अभिषेक, १० वाजता सत्यनारायण पूजा, दुपारी १२ वाजता महाआरती, १ ते ३ पर्यंत महाप्रसाद, ३ वाजता पाटेकर महिला भजन मंडळा ( पणदूर) चे भजन, सायंकाळी ४.३० वाजता शिवाजी इंग्लिश स्कूल (पणदूर) च्या मुलांचा संगीताचा कार्यक्रम आणि रात्री ८ वाजता बोर्डवकर दशावतार नाट्य मंडळा (दौडामार्ग) चे नाटक होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन स्वामी समर्थ मठाचे कार्याध्यक्ष नवीनचंद्र पालव यांनी केले आहे.
---------------------
आवळेगाव येथे
आज दत्त जयंती
कुडाळ, ता. १३ ः आवळेगाव येथील दत्त मंदिरात उद्या (ता.१४) दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ६ ते दुपारी ३ पर्यंत पारायण, ३ वाजता घटस्थापना, रात्री ९ वाजता उद्योजक चंद्रशेखर सावंत यांचा मंदिर योगदानानिमित्त तसेच अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. रात्री ११ वाजता दत्तजन्म सोहळा, १२ वाजता पालखी मिरवणूक, १२.३० वाजता तीर्थ- सुंठवडा वाटप व १ वाजता खानोलकर दशावतार मंडळाचे नाटक द होणार आहे. तसेच १५ ला दुपारी महाप्रसाद होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन नंदकुमार सावंत, सुनील सावंत व ग्रामस्थांनी केले आहे.
--------------------
कणकवली परबवाडीत
आज दत्त जयंती उत्सव
कणकवली, ता. १३ ः परबवाडी येथील दत्त मंदिरात उद्या (ता.१४) दत्त जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. सकाळी ७ वा. अभिषेक, १० वा. झोळी फिरविणे, सायं. ६.०२ वा. दत्तजन्म, रात्री ८ वा. महाप्रसाद, ९.३० वा. भजने ’ होतील. लाभ घेण्याचे आवाहन छ. शिवाजी महाराजनगर व परबवाडी येथील सावंत परिवाराने केले आहे.
-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT