कोकण

पांचाळवाडीत दत्त जयंती

CD

पांचाळवाडीत दत्त जयंती

गुहागर ः तालुक्यातील आंबेरेखुर्द येथील पांचाळवाडी येथे प्रतिवर्षीप्रमाणे श्री दत्त जयंती उत्सव सुरू झाला आहे. शुक्रवारी (ता. १३) सकाळी १० वा. श्रींच्या मूर्तीवर अभिषेक, आरती आणि तीर्थप्रसाद, सायंकाळी ४ वा. महिलांचे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, ९ वा. आरती, भोवत्या आणि शेंबेकर गुरूजी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १४ ला सकाळी १० वा. श्रींच्या मूर्तीवर अभिषेक, आरती, तीर्थप्रसाद आणि सायं. ५ वा. शेंबेकर गुरूजी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर श्री दत्त जन्मोत्सव सोहळा आणि रात्री ८ वा. मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि भजन, १० वा. आरती, भोवत्या. १५ ला सकाळी १० वा. श्रींच्या मूर्तीवर अभिषेक, होमहवन, आरती आणि त्यानंतर दुपारी १ वा. सर्वांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. त्यानंतर सायं. ५ वा. हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, रात्री ८ वा. आरती, भोवत्या आणि शेंबेकर गुरूजी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम, १०.३० वा. रोहन पेडणेकर लिखित एकांकिका पाझर असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
---
भडे शाळेत
गणवेश वाटप
पावस ः भडे शाळा नं. १ मध्ये विद्यार्थ्यांना मोफत क्रीडा गणवेश वाटप करण्यात आले. भडे गावचे सुपुत्र व माजी विद्यार्थी सूर्यकांत भरणकर यांनी विद्यार्थ्यांना मोफत क्रीडा गणवेश दिले. क्रीडा गणवेशामुळे खेळातील एकतेचे दर्शन होते व खेळाडूंना खेळण्यास अधिक प्रोत्साहन मिळते. शाळेने विभागस्तरीय कुस्ती स्पर्धा, विभागस्तरीय आट्यापाट्या स्पर्धा त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत नेहमीच घवघवीत यश संपादन केले आहे. त्या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सानिका तोस्कर, संजीव राऊत, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य भडे गावचे पोलिस पाटील प्रशांत बोरकर, भडे नं. १ शाळेचे मुख्याध्यापक लीलाधर कुड आदी उपस्थित होते.
---
वक्तृत्व स्पर्धेत
कोतापकर प्रथम
लांजा ः लोकमान्य वाचनालयातर्फे महिलांसाठी तालुकास्तरीय खुल्या गटात वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये वृंदा कोतापकर हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर अनुजा कांबळे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. महिला तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत २६ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. वर्षा ब्रीद यांनी तृतीय क्रमांक पटकावला तर उत्तेजनार्थ क्रमांक स्वानंदी जोगळेकर आणि प्रीती भिडे यांनी मिळवला. यशस्वी पहिल्या तीन स्पर्धकांना व उत्तेजनार्थ दोन क्रमांकाना सन्मानित करण्यात आले. सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
---
शीर शाळेला
ड्रेसचे वाटप
गुहागर ः हिवाळी क्रीडा स्पर्धांचे औचित्य साधून जि. प. केंद्रशाळा शीर नं. १ मधील सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना शीर गावचे सुपुत्र व युवा नेतृत्व, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षणतज्ञ मंगेश बाळकृष्ण मते व त्यांचे मुंबई येथील बंधू संदेश बाळकृष्ण मते यांच्यातर्फे ड्रेसचे वाटप करण्यात आले. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक गुरव व उपाध्यक्ष अजय पाटील यांच्या हस्ते या ड्रेसचे वितरण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक सुहास गायकवाड यांनी या वेळी मते यांच्या सामाजिक कार्याचा गौरवाने उल्लेख केला. या शाळेला नेहमीच त्यांचे सहकार्य लाभत असते. तसेच शाळेची गरज ओळखून स्वयंप्रेरणेने एका आठवड्यात सदर ड्रेस उपलब्ध करून दिल्याबद्दल मते बंधू यांना धन्यवाद दिले.
---
कळसवलीत उद्या
गोवर्धन पूजा
राजापूर ः तालुक्यातील कळवसली येथील आचार्य कृष्णकृपा श्रीमूर्ती, ए. सी. भक्तीवेदांतस्वामी श्रील प्रभूपाद (मार्गदर्शित) हरिनाम प्रचारकेंद्रामध्ये श्री गोवर्धन पूजा महोत्सव रविवारी (ता.१५) साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने रविवारी सायंकाळी ७ वा. हरिनाम कीर्तन, रात्री ७.३० वा. प्रवचन, ८.३० वा. श्री गोवर्धन प्रदक्षिणा, ९ वा. महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन विश्‍वेश्‍वरदास, दयानंद चौगुले प्रभू, संतोष शेडेकर प्रभू, दत्तात्रय प्रभू, पिलाजी लोळगे प्रभू यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Girl Acid Attack: शाळेतून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; अहिल्यानगर हादरलं, नराधम फरार

Laxman Hake : सुनेत्रावहिनींना विधानपरिषदेवर बिनविरोध पाठवा; बारामतीची निवडणूक आम्ही ठामपणे लढविणार...

Pune Traffic: महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे उद्यापासून पुण्याच्या वाहतुकीत बदल; लोणीकंद-खराडी मार्गावर अवजड वाहनांना बंदी

हा राया नाहीतर भलताच ! मालिकेतून 4 कलाकार बाहेर पडल्यानंतर आलेल्या नव्या ट्विस्टने प्रेक्षक चक्रावले

दोन बहिणी, दोन मालिका, झी मराठीच्या 'या' नायिका आहेत सख्ख्या बहिणी; गाजवतायत टीव्ही इंडस्ट्री, तुम्ही ओळखल्या का?

SCROLL FOR NEXT