कोकण

-हर्णै बंदरातील नौकावर बसवले ट्रान्सपॉन्डर

CD

-rat१३p२८.jpg-
P२४N३१४५२
दापोली ः हर्णै बंदरातील नौकांवर ट्रान्सपॉन्डर बसवण्याचे काम सुरू झाले आहे.
----------
हर्णै बंदरातील नौकावर बसवले ‘ट्रान्सपॉन्डर’

मच्छीमारांना मिळणार तात्काळ मदत ; ५२५ उपकरण उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १३ ः मासेमारी करणारे मासेमारीसाठी खोल समुद्रात जात असतात. अनेकदा समुद्रात अचानकपणे आपत्कालीन परिस्थिती उद्भवते. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी मच्छीमारांना तत्काळ मदत मिळावी, या उद्देशाने मासेमारी नौकांवर ट्रान्सपॉन्डर उपकरण बसवण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला.
हर्णै बंदरात साधारणपणे लहान-मोठ्या ८५० मासेमारी करणाऱ्या परवानाधारक नौका आहेत. यापैकी ६ सिलिंडरच्या नौकांवर ट्रान्सपॉन्डर हे उपकरण बसवण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीत जसे की, आग लागणे, नौकेचे इंजिन खराब झाल्यास नौका समुद्रात बुडत असल्यास नौकांवर, खलाशांना वैद्यकीय मदत लागल्यास या उपकरणाद्वारे संदेश पाठवता येतो. त्यामुळे मदत मिळण्यास सोपे होते. ट्रान्सपॉन्डर उपकरणामध्ये असलेले आपत्कालीन बटन हे थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क करते. त्यामुळे नियंत्रण कक्षाला बोटीच्या समुद्रातील स्थळासह अलर्ट प्राप्त होतो व त्यानुसार नौकेवरील नभमित्र अॅपद्वारे नियंत्रण कक्षाकडून संदेश प्राप्त होतो.
ट्रान्सपॉन्डर उपकरण बसवणे हे नौकामालक तसेच मासेमारी खलाशी यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. हर्णै बंदरातील नौकांवर ट्रान्सपॉन्डर बसवण्याचे काम सुरू झाले आहे. नौकांवर बसवण्यासाठी ५२५ ट्रान्सपॉन्डर उपकरण उपलब्ध झाले आहेत. हर्णैनंतर दाभोळ आणि त्यानंतर बुरोंडी येथील नौकांवर बसवण्यात येणार आहे, असे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी दीप्ती साळवी यांनी सांगितले.
--------
कोट
कोणतीही तत्कालीन सेवा मिळवण्यासाठी हे उपकरण खूपच नौकांसाठी उपयुक्त आहे. शासनाकडून सर्वच नौकांना ही मोफत सुविधा पुरवली जात आहे. यामुळे नौकांना कितीही दूरवर मासेमारीकरिता गेले असता चांगलाच फायदा होऊ शकतो.
-अनंत चोगले, मच्छीमार, हर्णै

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

Junk Food Cancer Myth: जंक फूड सोडलं म्हणजे कॅन्सरचा धोका संपला? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य, काळजी घ्या

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

Viral News: मूळव्याध शस्त्रक्रियेनंतरही सुट्टी नाकारली! अखेर लोको पायलटने अधिकाऱ्यासमोरच काढली पँट; रेल्वेतील धक्कादायक प्रकार

Arjun Tendulkar Marriage: अर्जुन-सानियाचं लग्न! तेंडुलकर कुटुंब सजलं, मेहंदी-संगीत सोहळ्यासाठी सेलिब्रेटिंचीही हजेरी; Video Viral

SCROLL FOR NEXT