कोकण

जिंदल कंपनीवर तत्काळ गुन्हा दाखल करा

CD

३१४३८
वाढावा
३१४३९

जिंदल कंपनीवर तत्काळ गुन्हा दाखल करा
उदय सामंत ः वायू गळतीप्रश्‍नी अपर जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी समिती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : जिंदल पोर्ट कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच गॅस गळतीचा हा प्रकार घडला आहे. कंपनीच्या हॉस्पिटलमध्ये औषधे नाहीत, डॉक्टर नाहीत. १०० खाटांच्या हॉस्पिटलबाबत दिलेला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे आजच्या आज जिंदल कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. आठ दिवसांत त्याचा अहवाल दिला जाणार आहे. त्यानंतर वस्तुस्थिती पुढे येईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार, असा थेट इशारा आमदार उदय सामंत यांनी दिला.
जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत म्हणाले, ‘‘जिंदल कंपनीमध्ये काल दुर्दैवी प्रकार घडला. वायू गळती झाल्यामुळे ६९ विद्यार्थी बाधित झाले. त्यांची प्रकृती पाहण्यासाठी आज मी आलो. जिल्हा रुग्णालयात वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ५१ विद्यार्थी दाखल आहेत. परकार हॉस्पिटलमध्ये १८ मुले अशी एकूण ६९ विद्यार्थी बाधित झाले आहेत. आज त्यांची विचारपूस केली. सर्वांची प्रकृती सुधारली आहे त्यानंतर मी आढावा बैठक घेतली.’’
स्थानिकांचे म्हणणे आहे की, जिंदल कंपनीच्या निष्काळजीपणामुळे गॅसगळती हा प्रकार घडला. कंपनीने दक्षता घेणे अपेक्षित होते; परंतु कोणतीही सुरक्षेची खबरदारी घेतलेली नाही. मी आणि प्रशासनदेखील याबाबत सहमत आहे. जिंदल कंपनीने उभ्या केलेल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाहीत, औषध नाहीत. कंपनी स्थानिकांची फसवणूक करत आहे. त्यामुळे आजच कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

अशी असेल समिती
वायू गळतीसह अन्य कंपनीच्या अन्य गोष्टींच्या चौकशीसाठी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. यामध्ये प्रांताधिकारी जीवन देसाई असतील, पर्यावरण विभाग, पोलिस अधिकारी, बंदर विभाग, महावितरण, प्रदूषण नियंत्रण, शालेय समिती आदींचा समावेश असणार आहे.

याची होणार चौकशी
१०० खाटांचे सुसज्ज हॉस्पिटलची पूर्तता झाली का
कंपनीकडून झालेले जादा उत्खनन
परिसरात अपघातप्रसंगी कंपनीने असहकार्य


जिंदलच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी
जिल्हा शासकीय रुग्णालयात वायू गळतीबाबत उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीला जिंदल कंपनीचे अधिकारी होते. गॅसगळतीनंतर कंपनीने सौजन्य दाखवत कोणतीही मदत केली नाही. रुग्णवाहिका उपलब्ध केली नाही, संवेदनशीलता आहे की नाही, लोकांना गृहित धरता यापुढे असे चालणार नाही. कारभारात सुधारणा करा अन्यथा... अशा भाषेत उदय सामंत यांनी जिंदल कंपनीच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.


दृष्टिक्षेपात
आठ दिवसांत अहवाल होणार सादर
दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई
१०० खाटांचे हॉस्पिटल आहे कोठे
सुरक्षेबाबत कोणतेही उपाय नाहीत
कंपनीचे हॉस्पिटल औषध, डॉक्टरविना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Economic Crisis: पाकिस्तान व फिलिपिन्समध्ये चार दिवसांचा आठवडा; दरवाढीमुळे आपत्कालीन उपाययोजना, इंधन वाचविण्याचा प्रयत्न!

ICC T20I Rankings: वरुण चक्रवर्तीनं 'नंबर वन'चा ताज गमावला, तर अभिषेक शर्माच्या सिंहासनाला इशान किशनचं देतोय आव्हान

Sarpanch Bribe Case : गरीब ग्रामस्थाची झोपडी दुरुस्त करण्यासाठी सरपंचाने 15 हजारांची मागितली लाच, 'असा' अडकला जाळ्यात!

Kalamb Municipal Council Tightens Rules Against Garbage Dumping: कळंबमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर; नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा

Iran Missile Attack: सततच्या हल्ल्यांमुळे तणाव कायम; इराणकडून आखाती देशांवर क्षेपणास्त्र हल्ले, शस्त्रसंधी नाहीच!

SCROLL FOR NEXT