कोकण

गणेशगुळेतील वाळू उपशावर आक्षेप राजकीय

CD

गणेशगुळेतील वाळू उपशावरील
आक्षेप राजकीय ः तोडणकर

स्थानिक ग्रामस्थांना वापरण्यास परवानगी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १३ ः गणेशगुळे गावातील गुळेकरवाडीमार्गे गेली अनेक वर्षे समुद्रामधून वाळू काढून सर्व परिसरात विकली जात असल्याची चर्चा आहे. मात्र यासंदर्भात उपसरपंच प्रसाद तोडणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या परिसरातील किनाऱ्यावरील वाळू स्थानिक ग्रामस्थांना वापरण्यास परवानगी असल्याचे सांगितले. याबाबतचा ठराव यापूर्वी ग्रामपंचायतीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या वाळू उपशाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची चर्चा सुरू होती. तसेच यावर कारवाई करण्याची मागणीही केली जात होती. याबाबत तोडणकर म्हणाले, गणेशगुळे किनाऱ्यावरील वाळू गावातील स्थानिक ग्रामस्थांना वापरण्यास परवानगी आहे. असा ठराव यापूर्वी ग्रामपंचायतीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे तेथील वाळू चोरी करून घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही किंवा ती विकली जात नाही. असा प्रकार गेली अनेक वर्ष सुरू असून फक्त स्थानिक ग्रामस्थांना आवश्यक असेल तेवढीच वाळू त्यांनी आपल्या बांधकामासाठी वापरायची, असा ठराव ग्रामसभेत झाला आहे. त्यामुळे वाळू चोरीचा प्रकार उद्भवत नाही. काही लोक राजकीय फायदा उठवण्यासाठी या गोष्टीचा वापर करत असल्याचेही तोडणकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Latest Marathi News Live Update : देशभरात गॅस सिलिंडर टंचाईमुळे लोकांची धावाधाव सुरूच

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Beed RTE Admission, Fake Rent Agreements: आरटीई प्रवेशासाठी बनावट भाडेकरार? बीडमध्ये शाळेजवळ ‘पत्ता’ मिळवण्याची स्पर्धा

Kolhapur Gas Cylinder Shortage : कोल्हापुरात सिलिंडरसाठी रांगा, नागरिकांचे उन्हातान्हात प्रचंड हाल; प्रशासनाची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT