-rat५p११.jpg-
OP२५N३६५४०
रत्नागिरी : अभ्यंकर बालविद्यामंदिरच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना किशोर लेले. सोबत शिक्षिका व ईशस्तवन म्हणताना विद्यार्थिनी.
---------
अभ्यंकर विद्यामंदिरचे स्नेहसंमेलन
रत्नागिरी, ता. ७ : दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालविद्यामंदिराचे स्नेहसंमेलन उत्साहात झाले. स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फाटक हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक किशोर लेले उपस्थित होते. बालकमंदिराच्या व्यवस्थापिका सौ. आगाशे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विनोद नारकर, माजी व्यवस्थापक अनिल आग्रे उपस्थित होते.
वर्षभरात केलेल्या उपक्रमांची थोडक्यात माहिती मुख्याध्यापिका प्रज्ञा काळे यांनी सांगितली. प्रमुख पाहुणे श्री. लेले यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी बालदोस्तांनी तसेच सर्व शिक्षिका व सेविका यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले. त्यानंतर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम लहान मुलांनी सादर केला. सर्वच कार्यक्रमांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमांचे नियोजन शाळेच्या व्यवस्थापिका, मुख्याध्यापिका, शिक्षिका, सेविका यांनी केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.