रिगल महाविद्यालयात क्रीडा महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ७ : शृंगारतळी येथील रिगल कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात झाला. रिगल कॉलेज हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे विभागप्रमुख प्रा. बेर्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी बी. जी. बागल, प्रसन्ना वैद्य, शोएब मालाणी, हुजैफा ठाकूर उपस्थित होते. बागल यांनी सांगितले, रिगल कॉलेज येथे पारंपरिक शिक्षणपद्धतीपेक्षा जास्तीत जास्त कौशल्य शिक्षणावर भर दिला जात असल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेऊन कॉलेजचे नाव मोठे करावे. वैद्य यांनी विद्यार्थ्यांना खेळामुळे होणारे शारीरिक व मानसिक फायदे सांगितले. ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना खेळ खिलाडूवृत्तीने खेळण्याचा सल्ला दिला तसेच खेळासाठी सरावाची गरज असते हे सांगितले. रिगल कॉलेजच्या प्राचार्या मोरे यांनी उपलब्ध कोर्सेसची माहिती दिली. कबड्डीमध्ये (मुली) एसवायबीसीएने प्रथम कमांक मिळवले. डॉजबॉलमध्ये (मुली)- टीवायबीसीए, क्रिकेट (मुली)-टीवायबीसीए, खो-खो (मुली)- एफवायबीसीए. क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांक (मुले) रिगल वॉरियर्स आणि व्हॉलिबॉलमध्ये प्रथम क्रमांक (मुले) रिगल स्ट्रायकर्सने पटकावला तसेच वैयक्तीक खेळांमध्ये धावणे (मुली) प्रथम क्रमांक सुविधा पवार, द्वितीय क्र. संजना पागडे, गोळाफेक (मुली) प्रथम क्र. जान्हवी गोयथळे, (मुले) प्रथम क्र. राहुल कनगुटकर, थाळीफेक (मुली) प्रथम क्र. जान्हवी गोयथळे, थाळीफेक (मुले) प्रथम क्र. पार्थ पावरी यांनी पटकावला.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.